Education officer orders to update teachers’ information : शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर
Buldhana बनावट शालार्थ आयडीद्वारे शासनाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर शिक्षक विभाग आता अॅक्शन मोडवर आला आहे. जिल्ह्यातील सर्व अनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी शालार्थ प्रणालीत आपल्या संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत करावी, असे स्पष्ट निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिले आहेत.
शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते शासन निर्णय ७ नोव्हेंबर २०१२ अन्वये ‘शालार्थ’ प्रणालीद्वारे अदा केले जातात. यासाठी आवश्यक कागदपत्रे मुख्याध्यापकांनी त्यांच्या लॉगिनवरून अपलोड करणे बंधनकारक आहे. नुकत्याच झालेल्या शिक्षण आयुक्तांच्या ऑनलाईन बैठकीत हे काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचा आढावा घेण्यात आला.
Ravi Rana : पत्नीच्या पराभवाचं नैराश्य… रवी राणांनी बालिशपणे…
बुलढाणा जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या बैठकीत प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, प्राथमिक वेतन पथक अधीक्षक पंकज गवई, सुभाष थोंबाळे तसेच जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
शिक्षणाधिकाऱ्यांनी ७ नोव्हेंबर २०१२ ते ७ जुलै २०२५ या कालावधीतल्या वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडी आदेश, संस्थेचे नियुक्ती आदेश आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे रुजू अहवाल ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात १३ मे २०२५ च्या शासन निर्णयानुसार शाळांनी अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. अद्याप तीन शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नसल्याने त्यांनी ते तातडीने बसवावेत, असेही निर्देश देण्यात आले.
Lumpy disease : पाेळा सणावर लम्पीचे सावट; बैलांचा पाेळा भरवण्यावर प्रशासनाची बंदी
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती १९८१ अधिनियम, बिंदू नामावलीचे प्रमाणिकरण, तसेच शिक्षकांच्या दुय्यम सेवा पुस्तके अद्ययावत करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. २० ऑगस्टपर्यंत सर्व शाळांनी बिंदू नामावली विभागाकडे सादर करणे आवश्यक असून ३० ऑगस्टपर्यंत दुय्यम सेवा पुस्तके अद्ययावत करून अहवाल सादर करावा लागेल.तसेच शाळांमध्ये सखी सावित्री समिती गठीत करणे, तक्रार पेटी बसवणे, नियमित बैठकांचे आयोजन करणे या बाबींचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगून कार्यशाळेची सांगता करण्यात आली.








