संचालक मंडळाचे अधिकार संपुष्टात; विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांचे आदेश
Amravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय सहनिबंधक श्रीनिवास पांढरे यांची बँकेच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली असून, विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाचे अधिकार संपुष्टात आले असून, आता नवीन संचालक मंडळाची स्थापना होईपर्यंत बँकेचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून चालणार आहे.
बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबर २०२६ रोजी संपुष्टात आला होता. मात्र, संचालक मंडळाला मुदतवाढ मिळावी आणि कार्यकाळ संपल्यानंतरही पदावर कायम राहता यावे, यासाठी कायदेशीर लढा सुरू होता. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंदर्भातील याचिका फेटाळल्यानंतर प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.
बँकेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांच्यासह ११ संचालकांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील सुधारणांना उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अ वर्गातील सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ वाढविण्यासंदर्भातील तरतुदींना याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले होते.
अनिल सोले नियंत्रणाबाहेर; बंडखोरीवर ठाम असल्याने बावनकुळे हतबल
मात्र, न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर संचालकांना पदावर कायम राहण्याचा अधिकार नसल्याचे न्यायालयाच्या निर्णयातून स्पष्ट झाले. त्यामुळे संचालक मंडळाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता संपुष्टात आली.
नवीन संचालक मंडळ येईपर्यंत प्रशासकीय कारभार
संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर बँकेच्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत निर्णय होणे अपेक्षित होते. न्यायालयीन प्रक्रियेमुळे या नियुक्तीबाबतची स्थिती स्पष्ट होण्याची प्रतीक्षा होती. आता विभागीय सहनिबंधकांच्या आदेशानुसार श्रीनिवास पांढरे यांनी प्रशासक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर बँकेचा कारभार त्यांच्या नियंत्रणाखाली राहणार आहे.
दिल्लीला जाण्याआधी थांबा! रेल्वेचा अचानक मोठा निर्णय; सर्व गाड्या रद्द
या नियुक्तीमुळे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासनात महत्त्वाचा बदल झाला आहे. नवीन संचालक मंडळाची स्थापना होईपर्यंत बँकेच्या कामकाजाची जबाबदारी प्रशासकाकडे राहणार आहे.








