Kapil sibbal is not judge, Rahul Narvekar attacks : अध्यक्षांच्या अधिकारावरील आक्षेपांवर राहुल नार्वेकरांचा नागपुरातून पलटवार
Nagpur उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नाहीत, त्यांनी न्यायाधीशासारखा निर्णय न देता केवळ आपला युक्तिवाद मांडावा; मी विधानसभा अध्यक्ष या नात्याने तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि संख्याबळ लक्षात घेऊनच सर्व निर्णय नियमानुसार दिले आहेत, अशा थेट शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सिब्बल यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नेमकी कोणाची? यावरून घमासान सुनावणी सुरू असून, कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात थेट विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरच गंभीर प्रश्न उपस्थित करत राहुल नार्वेकर यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.
Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी उचलला गैरफायदा !
युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी नार्वेकरांच्या निर्णयांवर ताशेरे ओढताना अध्यक्षांनी आपल्या अधिकारांच्या मर्यादा ओलांडून पक्षाच्या अंतर्गत कारभारात बेकायदेशीर ढवळाढवळ केल्याचा आरोप केला. शिवसेना फुटीनंतर विधिमंडळात झालेल्या मतदानासाठी दोन्ही गटांनी व्हीप बजावला होता, परंतु अध्यक्षांनी पक्षाची मूळ घटना न तपासता केवळ आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे शिंदे गटाच्या प्रतोदाला मान्यता दिली. मूळ पक्षात फूट पडलेली नसून ती केवळ विधिमंडळ पक्षात होती; त्यामुळे मूळ शिवसेनेच्या प्रतोदाचाच व्हीप सर्व आमदारांना लागू होतो, असे सांगत सिब्बल यांनी अध्यक्षांचे निर्णय बेकायदेशीर ठरवून रद्द करण्याची मागणी न्यायालयात केली.
Sanjay Raut: फडणवीस महान समाजसेवक, त्यांनी आता दिल्लीत जाऊन देशाची सेवा करावी
सिब्बल यांच्या या आक्रमक मांडणीवर नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी सडेतोड उत्तर दिले. विधानसभा अध्यक्ष म्हणून मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे केले असून त्यावेळची राजकीय परिस्थिती आणि संख्याबळ पाहूनच निर्णय दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बुधवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असून सिब्बल यांच्या युक्तिवादाचा हा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे आपल्या अंतिम मांडणीत सिब्बल कोणते नवे कायदेशीर मुद्दे उपस्थित करतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








