व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Raut: फडणवीस महान समाजसेवक, त्यांनी आता दिल्लीत जाऊन देशाची सेवा करावी

Sanjay Raut: फडणवीस महान समाजसेवक, त्यांनी आता दिल्लीत जाऊन देशाची सेवा करावी

Devendra Fadnavis should do social work in Delhi, says Sanjay Raut: संजय राऊतांचा टोला; अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावरून बोचरी टीका

Mumbai मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सतत नवनवे दावे करणारे आणि राजकीय हल्लाबोल करण्याची एकही संधी न सोडणारे उद्धव सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना, देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राची सेवा करू द्या, त्यांना दिल्लीत पाठवू नका, असे भावनिक आवाहन केले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेत संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे महान समाजसेवक आहेत. त्यांनी आता महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता दिल्लीत जाऊन देशाची सेवा करावी. यासाठी त्यांना फक्त बंगलाच बदलायचा आहे.

Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान पुन्हा मंत्रिमंडळात परतणार? केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांनी दिल्लीत राजकीय उष्णता वाढली!

यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्या घोषणांची आठवण करून देत राऊत यांनी अत्यंत बोचरी टीका केली. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, अशी जाहीर घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परंतु, आजतागायत स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती झालेली नाही; मात्र तरीही फडणवीस विवाहित झाले या शब्दांत राऊत यांनी त्यांच्या वैयक्तिक व राजकीय भूमिकेवर बोट ठेवले.

NTAs big decision : ६०० तज्ज्ञांची हकालपट्टी एनटीएचा मोठा निर्णय !

यापूर्वी माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत फडणवीसांशी चर्चा केल्याची माहिती देऊन, हा केवळ राजकीय तर्क नसून खात्रीलायक माहिती आहे, असेही त्यांनी ठासून सांगितले होते.
मात्र, संजय राऊतांच्या या दाव्यांवर आणि दिल्ली वारीच्या चर्चांवर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी करत सर्व अंदाज फेटाळून लावले आहेत. मी नेहमीच दिल्लीत जात असतो. मी मुंबईत असो वा दिल्लीत, अशा चर्चा नेहमीच सुरू असतात. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली आहे आणि ती मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहे. मी महाराष्ट्रातच राहणार, असे ठामपणे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या दिल्ली वारीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

error: Content is protected !!