व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण SIR campaign : अमरावती जिल्ह्यात वाढणार ८० केंद्र; चार मतदारसंघांत केंद्रांची वाढ

SIR campaign : अमरावती जिल्ह्यात वाढणार ८० केंद्र; चार मतदारसंघांत केंद्रांची वाढ

80 new polling stations to be added in Amravati district : ‘एसआयआर’मध्ये मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, १२०० पेक्षा अधिक मतदार असलेल्या केंद्रांचे विभाजन

Amravati मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षणासोबतच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येत आहे. एका मतदान केंद्रावर आता कमाल १२०० मतदार ठेवण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत सुमारे ८० नवीन मतदान केंद्रे वाढणार आहेत. मतदारसंख्येत झालेल्या वाढीमुळे अमरावती आणि बडनेरा मतदारसंघांत सर्वाधिक केंद्रांची भर पडणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.

जिल्ह्यात ‘एसआयआर’ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यानंतर या प्रक्रियेचा दुसरा भाग म्हणून मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या निकषांनुसार आठही विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांची माहिती मागविण्यात आली आहे.

Ambadevi–Ekvira Devi temples : अंबादेवी-एकवीरा देवी मंदिरांसाठी ४१० कोटींचा विकास आराखडा

जिल्ह्यात यापूर्वी १२०० पेक्षा अधिक मतदार असलेली ३२८ मतदान केंद्रे होती. आता प्रत्येक केंद्रावर जास्तीत जास्त १२०० मतदार ठेवण्यात येणार असल्याने या केंद्रांचे विभाजन केले जाणार आहे. त्यातून नवीन मतदान केंद्रांची निर्मिती होणार आहे. आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘आरओ’च्या माध्यमातून मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, तिवसा, दर्यापूर, धामणगाव आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांच्या संख्येत फारसा बदल होणार नसल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने स्पष्ट केले.

१२०० पेक्षा अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रांचे विभाजन करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात सुमारे ८० नवीन मतदान केंद्रे वाढणार आहेत. यामध्ये अमरावती आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी ३२, मेळघाट मतदारसंघात १२, तर मोर्शी मतदारसंघात चार नवीन मतदान केंद्रांची भर पडणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक विभागाकडून तयारी सुरू आहे.

error: Content is protected !!