Strong criticism from BJP leader and former minister Sudhir Mungantiwar : भाजपा नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची जोरदार टीका
Nagpur : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण वेगवेगळ्या विषयावरून चांगलेच तापले आहे, मराठी भाषा आणि जादूटोण्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. यावर भाजपा नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली. ठाकरे संदर्भात बोलताना ते म्हणाले की,
‘ हो, ते ब्रँड नक्कीच आहेत, पण तो ब्रँड आता बाजारात चालत नाहीये. अनेक ब्रँड बाजारात येतात पण सगळ्यांना ग्राहकांची पसंती मिळतेच असे नाही.’
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. मराठी भाषा आणि जादूटोण्यावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच केलेले धमकीचे विधान आणि जादूटोण्यासंदर्भातील टीकेवर भाजपा नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून, हा राजकारण करण्याचा विषय नाही.
Sudhir Mungantiwar : संगणक परिचालक मानधन, वेतन व भविष्याकडे वेधले लक्ष
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मराठी भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक होण्याची गरजच नाही. भाजप सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, जो काँग्रेस सरकार कधीच देऊ शकले नव्हते. 1956 मध्ये सीमावर्ती भागातील मराठी भाषिक नागरिकांची झालेली हेळसांड सांगताना मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. कारवार, निपाणी, बेळगाव, रायचूर हे मराठी भाषिक भाग जबरदस्तीने कर्नाटकात विलीन करण्यात आले, त्याला पंडित नेहरू जबाबदार होते, असेही त्यांनी नमूद केले.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या सिंहगर्जनेने गाजले विधानभवन !
आज कर्नाटक सरकारकडून मराठी लोकांवर भाषिक अन्याय केला जातो. मात्र महाराष्ट्र सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत आहे. मंत्री उदय सामंत यांनी त्या भागातील मराठीच्या संरक्षणासाठी निधी देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हे सरकार मराठीच्या संदर्भात पूर्णपणे संवेदनशील आणि वचनबद्ध आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या धमकीच्या विधानावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जर राज ठाकरे यांच्याकडे काही ठोस सूचना असतील, तर त्यांचे स्वागत आहे. पण मराठीवर केवळ राजकीय स्वार्थासाठी राजकारण नको, असे मुनगंटीवार म्हणाले.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या पुढाकाराने धान उत्पादकांना मिळणार गोसिखुर्दचे पाणी !
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाबाबत केलेल्या वक्तव्यावरही मुनगंटीवारांनी जोरदार टीका केली. जेव्हा पराभवाचे चटके बसतात, तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला ‘सिंदूर लावलेली’ वाटते. ही मानसिकता पराभवाने निर्माण होते, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ असे नाव देण्यात आल्यावर मुनगंटीवार म्हणाले, हो, ते ब्रँड नक्कीच आहेत, पण तो ब्रँड आता बाजारात चालत नाहीये. अनेक ब्रँड बाजारात येतात पण सगळ्यांना ग्राहकांची पसंती मिळतेच असे नाही.
____