व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांची दूरदृष्टी ठरली टर्निंग पॉइंट,चंद्रपूरात ‘ज्ञानगंगा’

Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांची दूरदृष्टी ठरली टर्निंग पॉइंट,चंद्रपूरात ‘ज्ञानगंगा’

Sudhir Mungantiwar’s vision becomes the turning point; the ‘Gyan Ganga’ set to flow in Chandrapur : मुनगंटीवार म्हणजे जिल्ह्यात शैक्षणिक प्रकल्प आणणारा भगीरथ

भगीरथाने तपश्चर्येतून गंगा पृथ्वीवर आणून मानवजातीला जीवनदायी प्रवाह दिला, त्याच प्रेरणेने चंद्रपूरच्या मातीत ज्ञानाची गंगा आणण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवणारे नेतृत्व म्हणजे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार. चंद्रपूरसारख्या पारंपरिकदृष्ट्या दुर्लक्षित मानल्या गेलेल्या जिल्ह्यात शिक्षण, संस्कार आणि आधुनिकतेचा त्रिवेणी संगम घडवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचताना दिसत आहे. बल्लारपूर येथे उभारण्यात येणारे एसएनडीटी महिला विद्यापीठ उपकेंद्र आणि त्यातून सुरू झालेला राज्यातील पहिला ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’ अभ्यासक्रम हा केवळ एक शैक्षणिक उपक्रम नसून, संपूर्ण प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा टर्निंग पॉइंट ठरत आहे.

मुनगंटीवारांची दूरदृष्टी, जिद्द आणि विकासाचा ठाम ध्यास यांचे प्रत्यंतर चंद्रपूर जिल्ह्यात उभारलेल्या भक्कम शैक्षणिक पायाभरणीतून प्रकर्षाने जाणवते. अत्यंत दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्याला शिक्षणाच्या नकाशावर अग्रस्थानी नेण्याचे ध्येय त्यांनी केवळ मांडले नाही, तर ते प्रत्यक्षात साकार करून दाखवले. एखाद्या उद्दिष्टाकडे सातत्याने, नियोजनबद्ध आणि परिणामकारक वाटचाल करत मोठे प्रकल्प उभे करणे हे सहजसाध्य नसते; मात्र मुनगंटीवारांनी आपल्या कृतीतून ते सिद्ध करत अशी कामगिरी उभी केली आहे की, त्यांच्या कार्यक्षमतेला आता कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज उरलेली नाही.

Sudhir mungantiwar : चमन मेटॅलिक्सची मुजोरी खपवून घेणार नाही, सुधीर मुनगंटीवारांचा कंपनीला फायनल इशारा!

 

सैनिकी स्कूलच्या माध्यमातून शिस्तबद्ध व राष्ट्रभक्तीपर शिक्षण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर होण्याची संधी, तसेच कृषी, अभियांत्रिकी आणि तांत्रिक शिक्षण संस्थांद्वारे कौशल्याधारित शिक्षणाचा विस्तार या सर्व उपक्रमांची साखळी आता ‘ज्ञानकेंद्र’ उभारण्याच्या दिशेने पुढे जाताना दिसते.

विशेष म्हणजे, बल्लारपूर येथील एसएनडीटी उपकेंद्र आणि महिला सक्षमीकरणाशी जोडलेले प्रकल्प हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नाहीत, तर सामाजिक बदलाची नवी वाटही दाखवतात. ५० एकरांच्या विस्तीर्ण परिसरात उभे राहणारे हे केंद्र महिलांसाठी शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील मुलींसाठी उच्च शिक्षणाची दारे त्यांच्या जिल्ह्यात खुली होत आहेत, ही या उपक्रमाची मोठी सामाजिक उपलब्धी मानली जाते.

Sudhir mungantiwar : नांदेडच्या भाविकांची मुनगंटीवारांकडे धाव; हस्तक्षेपाने सुटला प्रश्न

जिल्ह्यात सुरू होणारे विविध अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रक्रियेला वैचारिक अधिष्ठान मिळत आहे. भारतीय संस्कृती, मूल्ये आणि आधुनिक शिक्षण यांचा संगम घडवण्याचा प्रयत्न हा केवळ सैद्धांतिक न राहता प्रत्यक्ष शिक्षणप्रणालीत उतरवण्याचा प्रयत्न येथे दिसतो. जागतिक स्तरावर भारतीय ज्ञानपरंपरेबद्दल वाढती उत्सुकता आणि देशांतर्गत शिक्षणात मूल्याधारित दृष्टिकोनाची गरज या दोन्ही गोष्टी लक्षात घेता हा उपक्रम काळाच्या गरजेला साजेसा ठरतो.

मुनगंटीवार यांच्या कार्यपद्धतीतील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘घोषणांपेक्षा कृती’ हा दृष्टिकोन. अनेकदा विकासाच्या चर्चा केवळ धोरणांपुरत्या मर्यादित राहतात, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्यक्ष शैक्षणिक संस्थांची उभारणी करून त्यांनी विकासाला मूर्त स्वरूप दिले आहे. शिक्षण क्षेत्रातील ही सातत्यपूर्ण गुंतवणूक भविष्यात उद्योग, रोजगार आणि सामाजिक प्रगतीला चालना देणारी ठरणार आहे.

Sudhir Mungantiwar: चंद्रपूरच्या विकासाचा बुलंद आवाज: विधानसभेत मुनगंटीवारांचा ‘परिणामकारक’ लढा

विदर्भातील दुर्गम भागात अशा प्रकारे ज्ञानकेंद्र उभे राहणे म्हणजे विकासाचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रभावी प्रयत्न मानला जातो. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा केवळ औद्योगिक किंवा खाणक्षेत्रापुरता मर्यादित न राहता ‘शैक्षणिक हब’ म्हणून उदयास येण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूरसाठी टाटा समूहातर्फे ९ ट्रेनिंग सेंटरसाठी २६७ कोटी रू. निधी, ग्रंथालय व मुलींचे वसतीगृह यासाठी १२ कोटी रू. निधी, बल्‍लारपूर येथे डिजीटल शाळा, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे उपकेंद्र स्‍थापन करण्‍यासाठी प्रयत्‍न, बल्‍लारपूर, पोंभुर्णा, मुल येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था अधिक सक्षम करण्‍यासाठी प्रयत्‍न आ. मुनगंटीवार यांनी केले आहे. मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्‍यासाठी राज्‍य शासनाने मान्‍यता मिळवून घेतली. त्यांचा शैक्षणिक विकासाचा दृष्टीकोन जिल्ह्याच्या विकासाला वेगळी उंची बहाल करणारा ठरला आहे.

Sindkhedraja grampanchayat : खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत बंडाची ठिणगी; सरपंचांविरोधात अविश्वास प्रस्ताव

एकूणच, सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टी, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे चंद्रपूरमध्ये सुरू झालेली ही शिक्षणक्रांती भविष्यात विदर्भासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श मॉडेल ठरेल. ज्ञान, संस्कार आणि संधी यांचा संगम घडवत हा ‘ज्ञानगंगेचा प्रवाह’ विद्यार्थांना शैक्षणिक उन्नतीच्या दिशेने नक्की नेणारा आहे. आणि यासाठी मुनगंटीवार यांच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे.

error: Content is protected !!