Sudhir Mungantiwar : छत्रपतींच्या स्फूर्ती केंद्रात नतमस्तक झाले नरेंद्र मोदी, मुनगंटीवारांच्या पुढाकारात झाली होती स्थापना !

Prime Minister Narendra Modi Bows at Chhatrapati Shivaji Maharaj Inspiration Center, Established Through Sudhir Mungantiwar’s Initiative : शिवरायांचे ध्यान मंदिर ठरले देशभरातील भक्तांचे प्रमुख आकर्षण

Shrishailam – Andhra Pradesh : आमदार सुधीर मुनगंटीवार राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत उल्लेखनीय कार्य केले. अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटविणे असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनहून मातृभूमीत परत आणणे, अशा अनेक ऐतिहासिक कामगिरी त्यांनी केल्या. या कार्यगाथेच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणजे त्यांनी राज्याचे अर्थमंत्री असताना आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे उभारलेले ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्यानमंदिर’. या ध्यानमंदिरात अलीकडेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपतींच्या चरणी नतमस्तक झाले,ही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेणारी घटना ठरली.

श्रीशैलम येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज ध्यान मंदिर’ देशभरातील जनतेसाठी अभिमानाचा विषय ठरले आहे. या पवित्र स्थळावर शिवाजी महाराजांनी तपश्चर्या केली होती. त्याच ऐतिहासिक ठिकाणी मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ध्यान केंद्र उभारण्यात आले आहे. या स्फूर्ती केंद्राला अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत आदरांजली वाहिली. मोदींची ही भेट म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याची राष्ट्रीय पातळीवर घेतलेली दखल ठरली आहे.

Sudhir Mungantiwar : १०३ प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नोकऱ्या द्या, मुनगंटीवारांचे स्पष्ट निर्देश !

सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव वाढविण्याची संधी लाभली. लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून महाराजांची ऐतिहासिक वाघनखे भारतात आणणे, प्रतापगड पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटविणे, ब्रेल लिपीतील शिवचरित्र प्रकाशित करणे, राज्यभर ‘जाणता राजा’ महानाट्याचे मोफत प्रयोग, आग्रा येथे ‘दिवाण-ए-खास’ मध्ये शिवजयंती साजरी करणे, जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा येथे महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे, आणि रायगड येथील भव्य राज्याभिषेक सोहळा हे सर्व उपक्रम छत्रपतींच्या आदर्शांचा जयघोष करणारे ठरले, अशी प्रतिक्रिया आमदार मुनगंटीवार यांनी मोदींच्या श्रीशैलम भेटीनंतर दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा अभिमानही महाराष्ट्राला लाभला आहे आणि या प्रत्येक टप्प्यावर स्वराज्यभावना अधिक सशक्त होत आहे, असेही ते म्हणाले.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी टाकली आरोग्य सेवेत भर !

मार्च २०१८ मध्ये या भव्य ध्यानमंदिराचे उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालिन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते झाले. हे मंदिर राजस्थानातील लाल दगडातून घडवलेले असून, पुण्यातील धायरी येथील कलाकारांनी याचे शिल्पनिर्माण केले आहे. ध्यानमंदिराच्या मध्यभागी ध्यानस्थ स्थितीत बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती आहे. मंदिराभोवती राजगड, रायगड, प्रतापगड आणि शिवनेरी या चार किल्ल्यांची प्रतीकात्मक मॉडेल्स उभारण्यात आली आहेत. भिंतींवर महाराजांच्या जीवनातील प्रसंग दरबारातील क्षण, देवी भ्रामराम्बेचा आशीर्वाद, आणि राज्याभिषेकाचे दृश्य सुंदर कलाकृतींच्या माध्यमातून कोरले गेले आहेत.

Sudhir Mungantiwar : दिलेला शब्द मुनगंटीवारांनी काही तासांतच केला पूर्ण !

श्रीशैलममधील हे स्फूर्ती केंद्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श, साहस आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. हे केंद्र भावी पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरेल. शिवरायांचे तेज, त्यांची निष्ठा आणि त्याग या भूमीत कायम स्मरणात राहतील. अशी भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांची मंदिर उभारणीपासून राहिलेली आहे