Sudhir Mungantiwar’s initiative clears the way for payment of pending wages of thousands of forest workers in the Chandrapur Forest Circle : चंद्रपूर वनवृत्तातील हजारो वनमजुरांच्या थकीत वेतनाचा मार्ग मोकळा
Chandrapur चंद्रपूर वनवृत्तातील बारमाही आणि रोजंदारी हंगामी वनमजुरांचे मागील ७ ते ८ महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन अखेर शासनाच्या निर्णयामुळे अदा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून हजारो वनमजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या महत्त्वपूर्ण प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण व प्रभावी पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून शासनाने ९.९८१९ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
वनवृत्तातील बारमाही, रोजंदारी व रोपवनाशी संबंधित वनमजुरांचे वेतन दीर्घकाळ थकित राहिल्यामुळे त्यांच्या आर्थिक व कौटुंबिक जीवनावर मोठा परिणाम झाला होता. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आ. मुनगंटीवार यांनी वनमंत्री गणेश नाईक तसेच वन विभागाचे प्रधान सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर करून हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची जोरदार मागणी केली होती. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हा विषय त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणला होता.
Bhondubaba : ‘दत्तधाम सरकार’च्या नावाखाली भोंदूगिरीचा मोठा पर्दाफाश
मजुरांचे वेतन वेळेवर न मिळाल्यास त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो, तसेच वनसंवर्धन व संरक्षणाच्या कामांवरही त्याचा नकारात्मक परिणाम होत असल्याने हा विषय अत्यंत गंभीर असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी शासनाला पाठविलेल्या पत्रात अधोरेखित केले होते. मजुरांची थकीत मजुरी तात्काळ अदा करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने चंद्रपूर वनवृत्तासाठी सुमारे ९.९८१९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. ‘वेज बिल मॉनिटरिंग सिस्टिम’ अंतर्गत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार हा निधी मंजूर करण्यात आला असून तो केवळ वनमजुरांची प्रलंबित मजुरी अदा करण्यासाठीच वापरण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. या निर्णयामुळे आठ महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या वनमजुरांच्या वेतनाचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे.
Tcs nashik case : फरार निदा खानचा शोध सुरूच, लैंगिक शोषण व कथित धर्मांतर प्रकरणाने संताप वाढला
यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, वनमजुरांचे हक्काचे वेतन वेळेवर मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले. शासनाने सकारात्मक भूमिका घेत निर्णय घेतल्याने मला समाधान वाटते. या निर्णयामुळे चंद्रपूर वनवृत्तातील वनमजुरांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार मुनगंटीवार यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे वनविभागाच्या कामांना आता पुन्हा गती मिळणार आहे.






