Mul Railway Goods Shed Project Finally Halted! Powerful Follow-Up by MLA Sudhir Mungantiwar Achieves Major Success : प्रदूषण, आरोग्य व पर्यावरणाच्या धोक्यामुळे नागरिकांचा तीव्र विरोध; मुलकरांना मोठा दिलासा
Chandrapur-गेल्या अनेक दिवसांपासून मुलवासीयांच्या डोक्यावर टांगती तलवार असलेला मालधक्का (गुड्स शेड) प्रकल्प अखेर कायमचा ब्रेक लावण्यात आला आहे. राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्ली दरबारी केलेल्या यशस्वी शिष्टाईमुळे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाच्या उभारणी संदर्भात नकार दिला असून, यामुळे मुलकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुल रेल्वे स्थानकावर प्रस्तावित असलेल्या या मालधक्क्यामुळे लोहखनिज आणि इतर खनिजांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार होती. यामुळे केवळ प्रदूषणच नव्हे, तर शहराच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला असता. स्थानिक नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन आ. मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. या चर्चेअंती, जनहिताचा विचार करत रेल्वेमंत्र्यांनी हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.
आमदार मुनगंटीवार यांनी बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. आयर्न ओअरच्या लोडिंग-अनलोडिंगमुळे उडणारी धूळ नागरिकांच्या फुफ्फुसांसाठी घातक ठरली असती. धुळीमुळे पिकांचे नुकसान आणि जलस्रोत दूषित होण्याची भीती होती.
अवजड वाहनांमुळे मुल शहरातील अंतर्गत रस्ते खराब होऊन अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता होती. मालधक्क्यामुळे होणारे प्रदूषण भविष्यात घातक ठरले असते. म्हणूनच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांनी ती मान्य केल्याने मुलकरांचा विजय झाला असल्याचे या निर्णयावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या निर्णयाची माहिती मिळताच मुल शहरातील व्यापारी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Vijay Wadettiwar : मिरा भाईंदरमधील २५४ एकर सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव
दिल्लीतील या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, रेल्वेचे अजय दुबे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुनगंटीवार यांच्या या ‘मास्टरस्ट्रोक’मुळे आता मुल शहराचे पर्यावरण सुरक्षित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.








