Tiger attack in Nagpur? News of tiger entering a house in Bhandewadi creates a stir : सातच्या सुमारास नागरिकांना ‘बिबट’ दिसल्याचा दावा; त्या घरासमोर प्रचंड गर्दी, घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण
Nagpur : भांडेवाडी नागपूर परिसरातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक बिबट्या घुसला, ज्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली. स्थानिक लोकांनी “हेल्प फॉर अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन नागपूर” ला या घटनेची माहिती देताच, त्यांनी घटनास्थळी पोहोचून बिबट्याच्या उपस्थितीची पुष्टी केली आणि नागपूर जिल्हा वन्यजीव वॉर्डन, अजिंक्य भाटकर आणि टीटीसी सेंटर यांना माहिती दिली.
शहराच्या भांडेवाडी परिसरात आज (१९ नोव्हेंबर) सकाळी बिबट शिरल्याच्या माहितीने प्रचंड खळबळ उडाली. सकाळी साधारण सात वाजता काही नागरिकांनी एका घराजवळ बिबट दिसल्याचा दावा केला आणि काही क्षणातच ही बातमी संपूर्ण भागात वाऱ्यासारखी पसरली. पाहता पाहता त्या घरासमोर मोठी गर्दी जमा झाली, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.
स्थानिक नागरिकांच्या मते, घराच्या अंगणात आणि आसपास त्यांनी मोठ्या आकाराचा प्राणी पाहिल्याचे सांगितले. तो बिबटच होता! आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं, असा दावा काही रहिवाशांनी केला. मात्र काहींनी तो कुठला मोठा कुत्रा किंवा इतर वन्यप्राणी असण्याचीही शक्यता असल्याचे सांगितले. तरीही भीतीचे वातावरण कायम आहे.
गर्दी, गोंधळ आणि अफवा; परिसरात हलकल्लोळ..
बिबट दिसल्याची शक्यता जरी निश्चित नसली, तरी परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी घरांच्या गच्च्या, भिंती आणि रस्त्यावरून बघायला गर्दी केली. व्हिडिओ, फोटो काढण्याची धडपड सुरू झाली. काहींनी घरात लहान मुले आणि महिलांना आतच थांबण्याचे आवाहन केले. यामुळे त्या परिसरात काही वेळ वाहतुकीचीही कोंडी झाली. स्थानिक पोलीस यंत्रणेला याबाबत माहिती दिली असून त्यांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांना मागे हटण्याचे आवाहन केले. पण वाघ आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची गरज असल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे.
Local Body Elections : काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून पैशांचा आरोप!
वनअधिकारी पोहोचले..
परिसरात सापळा लावणे, तापसणी करणे आणि लोकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे निर्देश देणे आवश्यक असल्याचे नागरिक म्हणत आहेत. त्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची गरज आहे. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
Local Body Elections : बुलढाणा पालिकेत चौरंगी लढत! गायकवाड–शिंदे यांची ‘घराणेशाही’ आमनेसामने
खरोखर बिबट की अफवा?
घरात खरोखर बिबट शिरला आहे की ही फक्त भीतीमुळे पसरलेली अफवा, हे स्पष्ट करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. नागपूरच्या बाहेरच्या पट्ट्यात वाघांचा संचार वाढत असल्याने अशा घटना नव्या नाहीत. पण शहराच्या निवासी भागात असा प्राणी दिसणे गंभीर बाब मानली जात आहे. वनविभागाच्या तपासानंतरच वास्तविक परिस्थिती स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत भांडेवाडी परिसरात दक्षतेचे आवाहन करण्यात आले आहे.








