व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Uddhav Thackeray group : दोन दिवसांत तोडगा निघाला नाही तर कार्यालयाला टाळं...

Uddhav Thackeray group : दोन दिवसांत तोडगा निघाला नाही तर कार्यालयाला टाळं ठोकू

Shiv Sena aggressive on ZP tender scam : जिल्हा परिषद निविदा घोटाळ्यावर शिवसेना आक्रमक

Amravati जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात निविदा प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात सेनेच्या प्रतिनिधीमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांची भेट घेतली. दोन दिवसांत ठोस तोडगा न काढल्यास बांधकाम कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

शिवसेनेचा आरोप आहे की, जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ई-निविदा प्रक्रियेच्या नावाखाली सुशिक्षित बेरोजगार तरुणांची आर्थिक लूट केली आहे. अनेक प्रकरणांमध्ये आधी काम करून घेतले गेले आणि त्यानंतर निविदा जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे नवोदित ठेकेदारांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधीच मिळाली नाही.

Sudhir mungantiwar: मुनगंटीवारांचा निर्णायक पाठपुरावा; लोकतंत्र सेनानींच्या सन्मान निधीला दरमहा २० हजारांची मंजूरी

“ज्या कामांची निविदा जाहीर केली गेली, ती कामे आधीच पूर्ण झालेली असताना पुन्हा निविदा का काढली जाते?” असा सवाल यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.

शिवसेनेच्या म्हणण्यानुसार, निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक गुंतवणूक करावी लागते. मात्र, त्यांना प्रत्यक्षात काम मिळत नाही. यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

Nashik Politics : होय, ‘भाजप वॉशिंग मशिन’! सदस्य होण्यास कुठल्याही अटी शर्ती नाहीत

सीईओ संजीता महापात्र यांनी निविदा प्रक्रियेतील तक्रारी लक्षात घेऊन स्वतंत्र निविदा कक्ष स्थापन करण्याचा विचार व्यक्त केला. “पूर्वी जिल्हा परिषदेत अशा प्रकारचा स्वतंत्र निविदा कक्ष होता. तो पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!