Mumbai dominates Shiv Sena’s list of contact chiefs for Lok Sabha constituencies : मुंबईतील खास नेत्यांनाच संपर्कप्रमुख म्हणून लादण्यात आल्याची खंत
Nagpur उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाने राज्यातील लोकसभा मतदारसंघांनुसार आपल्या संपर्कप्रमुखांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या निवडीतून पुन्हा एकदा विदर्भाच्या वाट्याला उपेक्षाच आल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. विदर्भातील अवघे दोन अपवाद वगळता उर्वरित सर्वच लोकसभा मतदारसंघांवर मुंबईतील खास नेत्यांनाच संपर्कप्रमुख म्हणून लादण्यात आले असून, यामुळे पक्ष संकटात असताना तरी विदर्भातील स्थानिक नेतृत्वावर विश्वास दाखवला जाईल, या आशेवर असलेल्या स्थानिक शिवसैनिकांचा पार भ्रमनिरास झाला आहे.
जाहीर केलेल्या यादीनुसार नागपूर लोकसभा मतदारसंघाची धुरा पुन्हा एकदा सतीश हरडे यांच्याकडे तर वर्धा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सुधीर सूर्यवंशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
सतीश हरडे यांनी यापूर्वीही नागपूरचे संपर्कप्रमुख म्हणून काम पाहिले असून त्यांच्याच नेतृत्वात लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका लढल्या गेल्या होत्या. त्यांची ही पुनर्नियुक्ती ‘मातोश्री’वरील त्यांचे वजन स्पष्ट करते. मात्र, नागपूर आणि वर्धा हे दोन अपवाद वगळता उर्वरित सर्व मतदारसंघांतील संपर्कप्रमुख बदलून तिथे थेट मुंबईहून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यावरून उद्धव ठाकरे सेनेने सर्व लोकसभा मतदारसंघांची सूत्रे पूर्णपणे आपल्याच हाती ठेवल्याचे दिसून येत आहे.
Uday Samant : उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला; ‘टीका करण्यापेक्षा संयम ठेवून काम करा’
शिवसेनेत मोठी फूट पडली, तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुख्यत्वे मुंबई, ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांचा भरणा होता. याउलट, अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे तर थेट सुरतच्या वाटेवरून परत फिरले आणि त्यांनी ठाकरेंशी निष्ठा कायम ठेवली. संकटकाळात विदर्भाने पक्षाला साथ दिली असतानाही, सत्ता आणि संघटनेची सूत्रे मात्र पुन्हा एकदा मुंबईतीलच नेत्यांच्या हाती केंद्रित ठेवण्यात आली आहेत.
Brics summit 2026 : पुतीन भारतात दाखल, जिनपिंगही लवकरच येणार
विदर्भातील स्थानिक नेत्यांकडे दुर्लक्ष करायचे, सर्व महत्त्वाची पदे मुंबईतील नेत्यांकडेच ठेवायची आणि निवडणुका तोंडावर आल्या की विदर्भाची वारी करायची, हा आरोप शिवसेना नेतृत्वावर पूर्वीपासूनच होत आला आहे. सध्याच्या अत्यंत प्रतिकूल राजकीय पडझडीच्या काळात तरी ठाकरे सेना आपल्या धोरणात बदल करेल आणि विदर्भातील स्थानिक निष्ठावंतांना मोठी जबाबदारी देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, जाहीर झालेली यादी पाहता ‘मातोश्री’ने विदर्भावर पुन्हा एकदा अविश्वासाचीच मोहोर उमटवल्याची तीव्र भावना स्थानिक शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे.








