व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र OBC Reservation : मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र, ओबीसी महासंघ आक्रमक; जालन्यात एकाच...

OBC Reservation : मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र, ओबीसी महासंघ आक्रमक; जालन्यात एकाच नावाची पाचवेळा नोंद

National OBC Federation president Dr. Babanrao Taywade alleges discrepancies in the data on Kunbi records in Marathwada : कुणबी नोंदींच्या आकडेवारीत त्रुटी असल्याचा डॉ. बबनराव तायवाडे यांचा आरोप

Nagpur मराठवाड्यात कुणबी नोंदींच्या नावाखाली सरकार जाहीर करत असलेली आकडेवारी अत्यंत फुगवलेली असून त्यात प्रचंड त्रुटी असल्याचा थेट आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला आहे.

ज्यांच्याकडे वैद्यकीय व कायदेशीर पुरावे आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही; मात्र कागदपत्रे नसताना बेकायदेशीरपणे जात वैधता प्रमाणपत्रे दिल्यास तीव्र विरोध करू, असा इशारा त्यांनी नागपुरात दिला.

शासनाने मराठवाड्यात ४९ हजार कुणबी नोंदी सापडल्याचा दावा करत प्रसिद्ध केलेल्या यादीचा अभ्यास केला असता गंभीर बाबी समोर आल्याचे तायवाडे यांनी सांगितले. जालना जिल्ह्यातील ५,०२७ नावांच्या यादीत एकाच व्यक्तीचे नाव दोन ते पाच वेळा नोंदवले गेले आहे. अंबड तालुक्यातील दहिपुरी गावात ‘सिद्धू’ हे नाव ११ व्या आणि १३ व्या क्रमांकावर, तर ‘बापू अप्पा’ हे नाव तब्बल ५ वेळा आले आहे.

Chandrashekhar Bawankule : पाऊस रुसला तरी शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत देणार; बावनकुळेंनी दिला शब्द

५८ लाख नोंदींच्या आकडेवारीतही अशाच प्रकारे पुनरावृत्ती झाली असण्याची शक्यता व्यक्त करत, न्यायमूर्ती शिंदे समितीने सर्व याद्यांची छाननी (स्क्रूटनी) करून योग्य व खरा आकडा महाराष्ट्रातील जनतेसमोर आणावा, अशी मागणी त्यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य करण्यास नकार देत तायवाडे म्हणाले की, सरकार आणि आंदोलकांनी आपापसात चर्चा करावी. मंत्रिमंडळ उपसमितीने १५ मुद्द्यांचा जो मसुदा दिला आहे, त्यावर आंदोलकांकडून प्रतिक्रिया आल्याशिवाय चर्चा न करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे; त्यामुळे यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

error: Content is protected !!