व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vanchit Bahujan Aghadi : रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ‘जवाब दो’ ठिय्या आंदोलन

Vanchit Bahujan Aghadi : रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ‘जवाब दो’ ठिय्या आंदोलन

‘Jawab Do’ sit-in protest to make roads pothole-free: वंचित बहुजन आघाडीचा आमरण उपोषणाचा इशारा

Amravati शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने मनपा कार्यालयासमोर ‘जवाब दो’ ठिय्या आंदोलन केले.  महादेवखोरी परिसरात भोवते लेआउट ते महादेवखोरी पुलापर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याबाबत आघाडीने अनेकदा निवेदने सादर केली होती. याशिवाय खड्ड्यांमध्ये मनपाच्या नावाने कागदी नाव सोडणे, यशोदानगर चौकात आंदोलन अशा माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

२२ ऑगस्ट रोजी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून परिस्थिती मांडली होती. मात्र शहर अभियंता आणि झोन क्रमांक ३ चे उपअभियंता यांनी केलेल्या कामावर आघाडीने नाराजी व्यक्त केली. मनपाने फक्त मातीमिश्रित मुरूम खड्ड्यांमध्ये टाकल्याने खड्ड्यांची स्थिती अधिक बिघडली असून त्यात पाणी साचून रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत, पादचारी व शाळकरी मुलांच्या अंगावर घाणे पाणी उडत आहे. या समस्येमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

Bacchu Kadu : बच्चू कडू आता राज्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेणार

यशोदानगर रोड ते महादेवखोरी हा मुख्य रस्ता असून त्याला दांडगे लेआउट, वरुणनगर, गौतमनगर, गजानननगर, राजेंद्रनगर, कैलासनगर, बालाजीनगर, नीलकंठ लेआउट आदी वसाहती जोडलेल्या आहेत. या मार्गावरून हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, स्कूल बसेस, वयोवृद्ध नागरिक प्रवास करतात. मोठमोठ्या खड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. खड्डेमुक्तीची मागणी तातडीने मान्य न केल्यास मनपा आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

Raju Shetty : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या

शैलेश बागडे, बाबाराव गायकवाड, रमेश आठवले, प्रशांत गजभिये, बबलू रामटेके, सागर भोवते, अमोल जवंजाळ, रिनाताई गजभिये, अस्मिताताई बागडे, अलंकार बागडे, बबलू ढोके, विनय बांबोळे, जयेश रंगारी, प्रमोद राऊत, अजय रामटेके, रोशन गजभिये, सुबोध डोंगरे, विजय डोंगरे आदींची यावेळी उपस्थिती होती.

error: Content is protected !!