व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण खुर्चीसाठी मराठा-ओबीसीत आग लावली, वडेट्टीवार बरसले

खुर्चीसाठी मराठा-ओबीसीत आग लावली, वडेट्टीवार बरसले

जरांगे यांच्या क्लिपवरून फडणवीस-शिंदेंवर हल्लाबोल

Nagpur मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सत्तेसाठी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवून महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपवरून त्यांनी भाजप आणि शिंदे सेनेचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आणल्याची टीका केली.

नागपूर येथे माध्यमांसोबत बोलताना वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील यांनी काल एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून काही गोष्टी समोर आणल्या आहेत. या क्लिपची सत्यता तपासली पाहिजे आणि त्यामध्ये कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते सत्य जनतेसमोर आणण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे, असे ते म्हणाले. राज्यात दुष्काळाचे संकट आहे, बेरोजगारी वाढली आहे आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न अत्यंत गंभीर बनले आहेत. तरुणांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर असताना ‘देवाभाऊ’ आणि ‘एकनाथ भाई’ यांना मात्र केवळ मुख्यमंत्रीपदाची आणि खुर्चीची येऊन पडली आहे.

पोट्टेहो… उद्या मतदान, आज कराळे गुरुजींची राष्ट्रवादी काँग्रेसमधून पडली विकेट!

सत्तेसाठी समाजा-समाजात भांडणे लावणारे हे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नसून, देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे हे जनतेचे नसून केवळ सत्तेचे पाईक आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. या सत्तेच्या संघर्षात राज्याचे वाटोळे होत असून दोन्ही पक्षांमधील संघर्ष विकोपाला गेल्याची तिखट प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीतील अंतर्गत कलह आणि सत्ताधाऱ्यांवरील या गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलेच ढवळून निघाले आहे.

error: Content is protected !!