Uddhav Thackeray’s anger over ‘ghostly’ voter list! : मतदार यादीत ‘भुताटकी’ उद्धव ठाकरे यांचा संताप!
Mumbai : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना, मतदार याद्यांतील तफावत आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मनसे आणि महाविकास आघाडीने आधीच “सत्याचा मोर्चा” काढत या प्रकरणाविरोधात सरकारला घेरले होते. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत टीका करत “ही निवडणूक आयोगाची भुताटकी आहे!” अशी जोरदार टिप्पणी केली आहे.
शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, “एका-एका घरात ४० ते ५० नावं नोंदली गेली आहेत. ही भुताटकीच आहे! निवडणूक आयोग काय करतोय? निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक ठेवण्याची जबाबदारी आयोगाची आहे, पण आज त्याच्यावरच संशय घ्यावा लागतो.”
Asam Sarode : अॅडव्होकेट असीम सरोदेंना बार कौन्सिलचा मोठा झटका!
उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, “फक्त माझं नाव वगळलं म्हणून निवडणूक आयोगाने चौकशी केली. पण सर्वसामान्य नागरिकांनी दाद कधी मागायची? जर नाव वगळलं तर नागरिक मतदानच करू शकणार नाहीत. मग लोकशाहीचा अर्थ काय उरतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Doctor suicide case : “डॉ. संपदा मुंडेंच्या आत्महत्येनंतर वैद्यकीय क्षेत्रात संताप !
मोर्चानंतर आता ठाकरे गटाने पुढचे पाऊल उचलत मतदारांची ओळख तपासण्यासाठी स्वतंत्र केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. “आम्ही आमच्या शाखांमध्ये मतदारांची केंद्रे उघडतो आहोत. नागरिकांनी तिथे येऊन त्यांची नावं मतदार यादीत आहेत की नाहीत, हे तपासावं. कोणाचं नाव वगळलं आहे का, चुकीचं वय, लिंग किंवा धर्म नोंदवला आहे का, हेही तपासून बघा. जर गोंधळ वाटला, तर लगेच तक्रार करा,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
Maharashtra politics : “विठ्ठलाचं राज्य म्हणजे अजितदादा मुख्यमंत्री, आमदाराचं साकडं !
त्यांनी पुढे स्पष्ट केलं, “पुढच्या आठवड्याभरात आम्ही नागरिकांकडून आक्षेप आणि सूचना स्वीकारणार आहोत. आता जर कोणी झोपलं, तर तो संपला! कारण निवडणुकीत मतचोरी थांबवायची असेल, तर प्रत्येक मतदाराने जागं राहणं गरजेचं आहे.
निवडणूक आयोगावर हल्लाबोल करत उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्याला न दिसणारी, आपल्या परवानगीशिवाय न राहणारी नावं आपल्या घरात आहेत का, हे तपासा. ही आयोगाने उभी केलेली भुताटकी आहे. सर्व जाती-धर्म-पंथाच्या लोकांनी पुढे येऊन मतदार यादी तपासावी. आपल्या नावात, वयात, लिंगात किंवा धर्मात गोंधळ आहे का, हे बघा. ही लोकशाही वाचवण्याची वेळ आहे.
Ajit Pawar : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची धुरा अजित पवार यांच्याच हाती !
दरम्यान, मनसे आणि महाविकास आघाडीकडूनही मतदार याद्यांमधील तफावत आणि बोगस मतदारांविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्षांनी मतचोरीचा आरोप करत सरकार आणि निवडणूक आयोगाकडे पारदर्शक तपासणीची मागणी केली आहे.
राज्यात निवडणुका जवळ येत असताना “मतदार यादीतील भुताटकी” या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता निवडणूक आयोग या आरोपांवर काय भूमिका घेतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
____








