व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Voters Verification : मतदार यादी शुद्धीकरणाची मोठी मोहीम; बुलढाण्यात २०.९४ लाख मतदारांची...

Voters Verification : मतदार यादी शुद्धीकरणाची मोठी मोहीम; बुलढाण्यात २०.९४ लाख मतदारांची घरपोच पडताळणी

Door-to-door verification of 2.094 million voters underway in Buldhana district : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सक्रिय; ३० जूनपासून बीएलओंची घराघरांत मोहीम

Buldhana आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक विभागाने ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६’ हाती घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घराघरांत जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे २०.९४ लाख मतदारांचा या प्रक्रियेत समावेश होणार असल्याने ही मोहीम राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांसाठी २ हजार २८८ बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. हे अधिकारी मतदारांना अंशतः भरलेले गणना पत्र वितरित करणार असून, मतदारांनी त्यातील माहिती तपासून आवश्यक दुरुस्त्या करणे, छायाचित्र जोडणे आणि स्वाक्षरी करून ते बीएलओंकडे जमा करणे अपेक्षित आहे.

मतदार यादीतील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे वगळणे तसेच नव्याने पात्र ठरणाऱ्या मतदारांची नोंदणी करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने व्यापक पातळीवर तयारी सुरू केली आहे.

Supriya Sule : घरं आणि पक्ष फोडण्याचे उद्योग आम्ही करत नाही; नागपुरात सुप्रिया सुळेंचा विरोधकांवर घणाघात

या प्रक्रियेत राजकीय पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल एजंट (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, यामुळे मतदार यादीतील बदलांवर राजकीय पक्षांचेही लक्ष राहणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

Sunil kedar : ‘आयत्या बिळावर नागोबा’ बनून भाजपला कळमना बाजार समिती बळकावायचीय; माजी मंत्री सुनील केदार यांचा घणाघाती आरोप

निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित केला आहे. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून, त्यानंतर प्राप्त दावे आणि हरकतींवर सुनावणी होईल. अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रकाशित केली जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाने सर्व मतदारांना या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आगामी निवडणुकांतील मतदार व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही मोहीम निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.

error: Content is protected !!