Weather updates : चक्राकार सक्रिय, महाराष्ट्रभर परतीच्या पावसाचा जोर !

Red alert in some places and yellow – orange alert in others across the state : राज्यभरात कुठे रेड अलर्ट तर कुठे यलो – ऑरेंज अलर्ट

Mumbai : बंगालच्या उपसागरावर आणि अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील भागात चक्राकार सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रात परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात विस्तीर्ण स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

पश्चिम राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवू लागलाय. गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. रायगड आणि पुणे घाटमाथ्यावर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित भागात यलो अलर्ट आहे.

Illegal Sand Mining : रेती तस्करांचा हैदोस सुरूच; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

हवामान विभागानुसार, आज 15 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर अधिक असेल. पुढील तीन दिवस पाऊस हळूहळू कमी होईल, मात्र तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.

16 सप्टेंबर : रायगड, पुणे घाटमाथा व छत्रपती संभाजीनगर येथे ऑरेंज अलर्ट. कोकणपट्टीवर जोरदार पाऊस. संपूर्ण मराठवाड्यात यलो अलर्ट. सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग वगळता मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.

17 सप्टेंबर : विदर्भातील पावसाचा जोर कमी होणार. यवतमाळ व चंद्रपूर येथे यलो अलर्ट. बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यांत हलका पाऊस. उत्तर महाराष्ट्र, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव येथे यलो अलर्ट. सातारा, सांगली, कोल्हापूर येथे हलका पाऊस.

Dongao Gram Panchayat : अधिकाऱ्याचा प्रताप! रजेवर असताना ग्रामपंचायतच्या खात्यातून काढले ११ लाख रुपये

18 सप्टेंबर : रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांना यलो अलर्ट. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस.

19 सप्टेंबर : नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि रायगड जिल्ह्यांना यलो अलर्ट. बहुतांश मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस.

परतीच्या पावसामुळे अनेक भागांत नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरणांतून मोठा विसर्ग सुरू असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

____