Winter Session : नागपुरात 28 नोव्हेंबरपासून विधानमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू !

Legislative Secretariat to resume operations in Nagpur from November 28 : निवास, सुरक्षा, स्वच्छता, वाहतूक व कार्यालयीन सुविधांची जलदगतीने पूर्तता करण्याचे सचिव डॉ. विलास आठवले यांचे निर्देश

Nagpur : महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या 28 नोव्हेंबरपासून विधानमंडळ सचिवालयाचे कामकाज नागपुरात सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी आवश्यक असलेल्या निवास, कार्यालयीन व्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छतेच्या कामांना गती देण्याच्या सूचना महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव डॉ. विलास आठवले यांनी दिल्या.

विधानभवनात अधिवेशनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेताना डॉ. आठवले यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, तसेच महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विधानमंडळ सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MP-MLA Pending Case : खासदार- आमदारां विरोधातील प्रलंबित खटल्यांचा ढिगारा!

अधिवेशन काळात पीठासीन अधिकारी, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी रविभवन, नागभवन आणि आमदार निवास येथे तयार केल्या जाणाऱ्या निवास व्यवस्थेची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. शिवाय मुख्य प्रतोद व प्रतोद यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्याने त्यांच्या कार्यालयांसाठी स्वतंत्र सुविधा उभारण्याचेही निर्देश देण्यात आले. आमदार निवासातील पहिल्या इमारतीतील पहिला आणि दुसरा माळा महिला सदस्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

Bihari election result : महाराष्ट्राच्या सुपुत्राला बिहारनं नाकारलं !

स्वच्छता, पाणी, वीजपुरवठा आणि सुरक्षा या चार महत्त्वाच्या विभागांवर विशेष भर दिला जात आहे. विधानभवन परिसर, आमदार निवास, हॉटेल्स आणि रविभवन परिसरात कडक सुरक्षा उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आले. वाहन पार्किंगची समस्या टाळण्यासाठी पोलीस विभाग स्वतंत्र नियोजन तयार करत आहे. अधिवेशन काळात वाहतुकीची वाढ लक्षात घेता रेल्वे स्टेशनपासून विधानभवन व आमदार निवासपर्यंत उपलब्ध बस सेवा, वाहतूक नियंत्रण आणि पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करण्यावरही चर्चा झाली.

याशिवाय विधानभवन, आमदार निवास आणि रविभवन येथे आरोग्य सुविधा, हिरकणी कक्ष, इलेक्ट्रिक व दूरध्वनी कनेक्टिव्हिटी, आणि मंत्रिमंडळ सदस्यांसाठी अतिरिक्त दालने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही अधिकारी व कर्मचारी २० नोव्हेंबरपासून नागपूरमध्ये रुजू होत असल्याने त्यांच्या निवास व वाहन व्यवस्थेची पूर्तता तातडीने करण्याची सूचना देण्यात आली.

Sudhir Mungantiwar : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी धावून आले आ.सुधीर मुनगंटीवार

अधिवेशनाप्रसंगी मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी व नागरिक नागपूरला भेट देतात. त्यामुळे नागरिकांसाठीही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन प्रशासनातर्फे करण्यात आल्याचे डॉ. विलास आठवले यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशन सुरळीत, संयोजित व यशस्वी होण्यासाठी सर्व विभागांकडून समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला आहे.