व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण यशोमती ठाकूर यांच्या घरावर ड्रोनच्या घिरट्या; जीवाला धोका असल्याचा दावा

यशोमती ठाकूर यांच्या घरावर ड्रोनच्या घिरट्या; जीवाला धोका असल्याचा दावा

सुरक्षेसंदर्भात पोलिसांत तक्रार; संशयास्पद प्रकार असल्याची भीती

Amravati काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या गणेडीवाल ले-आउट येथील निवासस्थानावर अज्ञात ड्रोनने संशयास्पदरीत्या घिरट्या घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या ड्रोनद्वारे घराचे आणि परिसराचे अनधिकृतपणे छायाचित्रण करण्यात आल्याचा आरोप ॲड. ठाकूर यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी सोमवारी रात्री गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ॲड. ठाकूर यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी दुपारी १.४५ ते २ वाजताच्या सुमारास अज्ञात ड्रोन त्यांच्या घरावर सातत्याने घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घरातील सदस्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. हा केवळ गोपनीयतेचा भंग नसून, यामागे घातपाताचा हेतू असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ड्रोन कोणी आणि कोणत्या उद्देशाने उडवला, याचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकरणातील तांत्रिक बाबींचा तपास सुरू आहे. अद्याप कोणाविरुद्धही गुन्हा किंवा एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कागदोपत्री ‘ट्रिगर’ नको, हेक्टरी मदतीचा ‘फिगर’ सांगा!

दरम्यान, संबंधित ड्रोन शासकीय सर्वेक्षणासाठी किंवा अन्य अधिकृत कामासाठी वापरला जात होता का, याचीही माहिती घेण्यात आली. मात्र, पीडब्ल्यूडी किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेकडून त्या परिसरात असे सर्वेक्षण सुरू असल्याचे आढळून आले नसल्याचे ॲड. ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रकार संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नितेश कराळे गुरुजींच्या उमेदवारीने पदवीधर मतदारसंघात नवे समीकरण

‘आमच्या जिवाला धोका असू शकतो’

“सोमवारी दुपारी मी जिल्हाधिकारी कार्यालयावरील आंदोलनात सहभागी झाले होते. घरी परतल्यानंतर ड्रोनने आपल्या घरावर घिरट्या घातल्याचे समजले. घरातील कर्मचारी त्याचा व्हिडीओ घेणार तेवढ्यात ड्रोन निघून गेला. आमच्या जिवाला धोका असू शकतो. हा प्रकार अतिशय संशयास्पद आहे,” अशी प्रतिक्रिया ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

error: Content is protected !!