Rohit Pawars attack on Padalkar : रोहित पवारांचा पडळकरांवर हल्लाबोल
Sangli : सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. चंद्रकांतदादा पाटील हे भाजपचे खरे सोनं आहेत, पण काही बेन्टेक्स लोक जिल्ह्यात फिरत असून मोठ्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. या बेन्टेक्स सोन्याचं काय करायचं, हे भाजपच्या खऱ्या सोन्याने ठरवायला हवं, अशा शब्दांत त्यांनी पडळकरांवर टीका केली.
रोहित पवार म्हणाले की, अजितदादा म्हणजे यॉर्कर टाकणारे फास्ट बॉलर आहेत. त्यांच्या स्पीडमुळे बॅट्समन घाबरतो. चंद्रकांतदादा कधी बॅटिंग करतात, कधी बॉलिंग, पण ते सातत्याने मिडीयम पेस बॉलिंग टाकतात. जयंत पाटील कधी ऑफ स्पिन, कधी लेग स्पिन, कधी गुगली टाकतात आणि बॅट्समनला गोंधळात टाकतात. आम्ही मात्र अजून नवखे खेळाडू आहोत, पण जमेल तसे फटके मारण्याचा प्रयत्न करत आहोत.
अजित पवारांना टोला लगावत रोहित पवार म्हणाले की, काही वर्षांपूर्वी अधिवेशनात मी भाषण केले तेव्हा अनेकांनी कौतुक केले. अजितदादांनी मात्र भाषण चांगले झाले एवढे न सांगता भाषण करताना शर्टची बटणे वरपर्यंत लावायला सांगितली. ते इतके बारकाईने लक्ष देणारे होते, पण आता गावकी – भावकीपेक्षा निधीकडे लक्ष द्यायला हवे.
Vijay Wadettiwar : पोलिसांमध्ये काम न करता ‘सिंघम’ का संचारतो ?
सांगली जिल्ह्यात संस्कृतीला फार महत्त्व आहे. चंद्रकांतदादा भाजपचे खरे सोनं आहेत. ते समाजकारणालाही तितकेच महत्त्व देतात. मात्र काही बेन्टेक्सचे लोक खालच्या पातळीवर टीका करत फिरत आहेत. अशा लोकांवर भाजपच्या खऱ्या सोन्यानेच लक्ष द्यायला हवे, असे म्हणत रोहित पवारांनी पडळकरांवर थेट हल्ला चढवला.
_____








