व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र CM Youth Work Trainee Assistant Association : मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा निष्फळ, उद्या आंदोलन...

CM Youth Work Trainee Assistant Association : मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा निष्फळ, उद्या आंदोलन होणारच !

Discussions with the Chief Minister are fruitless, there will be a protest in Nagpur tomorrow : नोकऱ्या सोडून शासनाच्या प्रशिक्षण कामात लागले होते बेरोजगार तरूण

Nagpur : राज्य सरकारच्या आजवरच्या इतिहासात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सर्वाधिक लोकप्रिय तरली. या योजनेनेच महायुतीचे सरकार आणले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली, तेव्हा लाडक्या भावांचे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तेव्हा लाडक्या भावांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी घोषणा तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र त्यांची ती घोषणा हवेतच विरली.

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना घोषित करून १० लाख तरुणांना दरवर्षी कौशल्य विभागाअंतर्गत शासकीय आस्थापनांमध्ये प्रशिक्षण देऊन त्याच आस्थापनांमध्ये कायम करू, असा शब्त तत्कालिन सरकारने दिला होता. पण सरकार बदलले मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसले आणि या सरकारने तो शब्द फिरवला. आपल्या इतर क्षेत्रांतील नोकऱ्या सोडून तरुणांनी या योजनेत सहभाग घेतला, शासनाची कामे केली. पण आता सरकारने तरुणांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांच्या ‘मटण’ वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकुरकर यांनी याविरोधात आवाज उठवला. आंदोलनाचा इशारा देताच मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावले. यासाठी बालाजी पाटील चाकुरकर यांच्या नेतृत्वात विदर्भ प्रमुख अनुप चव्हाण, नागपूरचे जिल्हाध्यक्ष साईराज जनबंधू, अजय कौतुके, वरूण आवरस्कर या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. पण ही चर्चा निष्पळ ठरली. त्यामुळे संघटनेने उद्या (२५ ऑगस्ट) संविधान चौकात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mahadeo Jankar : पाशा पटेल यांच्या संवेदनाहीन विधानामुळे शेतकऱ्यांचा अपमान

एक लाख ३४ हजार प्रशिक्षणार्थ्यांना नियमित कायमस्वरुपी रोजगार मिळाला पाहिजे, प्रशिक्षणार्थ्यांना मानधनात दुप्पट वाढ झालीच पाहिजे, वयोमर्यादा ज्या दिवशी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी जॉईन झाला त्या दिवशीपासून मोजदाद झाली पाहिजे, या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत. उद्याच्या आंदोलनाचे नेतृत्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, अनुप चव्हाण आणि प्रकाश साबळे करणार आहेत.

error: Content is protected !!