Breaking

Prataprao Jadhav : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणार !

Health camp On the birth anniversary of rashtramata Jijau : सिंदखेडराजा व सवणा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

Buldhana गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. त्यांच्यावरही चांगले उपचार झाले पाहिजे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने आयुष्यमान भारत योजना संपूर्ण देशामध्ये राबवली जात आहे. या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम केले जात आहे, असा विश्वास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि चिखली तालुक्यातील सवणा येथे मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही आरोग्य शिबिरांचे उद्घाटन प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. सिंदखेड राजा येथील आरोग्य शिबिरात माजी आमदार शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे उपस्थित होते. तर सवणा येथील आरोग्य शिबीराच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, गजानन मोरे, शिवाजीराव देशमुख, विलास घोलप उपस्थित होते.

Beed Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीचा मोठा दावा !

या देशातील गोरगरीब जनतेला त्यांच्याच भागामध्ये चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे. या दृष्टिकोनातून शासनाकडून प्रयत्न करत असल्याचे जाधव यांनी सांगितले. देशातील आणि राज्यातील आरोग्याची सेवा सक्षम करणे. लोकांना सहज उपचार उपलब्ध करून देणे. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कटिबध्द आहे. गोरगरीब जनतेला महानगरातील हॉस्पिटलमध्येही आरोग्य उपचार घेता यावा, यासाठी आयुष्यमान भारत योजना राबविली जात आहे. या योजनेचा सर्वसामान्य जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जाधव यांनी केले.

Nitin Gadkari : आमदार, खासदार येतात जातात; लक्षात राहतं ते काम !

या शिबीरामध्ये अस्थिरोग तज्ञ, कान नाक घसा, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार तज्ञ, कर्करोग तज्ञ, बालरोग तज्ञ, पोटविकार तज्ञ, मानसिक आजार तज्ञ, हृदयरोग तज्ञ, मेंदु तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. याशिवाय नेत्र तपासणी, मोफत चष्मे आणि औषधीचे वाटप करण्यात आले. या शिबिरात अनेक गरजूंनी मोठ्या संख्येने सहभागी होवून आरोग्य सेवेचा लाभ घेतला.