व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungantiwar : नीरा नदीच्या तिरावर मुनगंटीवारांनी अनुभवली वारकरी परंपरेची दिव्यता!

Sudhir Mungantiwar : नीरा नदीच्या तिरावर मुनगंटीवारांनी अनुभवली वारकरी परंपरेची दिव्यता!

Sudhir Mungantiwar and his wife attend the ceremonial Abhyang Snan of the Padukas of Sant Dnyaneshwar Mauli on the banks of the Nira River : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका अभ्यंग स्नान सोहळ्यास सपत्निक उपस्थिती

Pune आषाढी वारीच्या अखंड भक्तिमय परंपरेत पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करताना नीरा नदीच्या पवित्र तीरावरील दत्त घाटावर पार पडणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांच्या अभ्यंग स्नान सोहळ्यास राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सपत्नीक उपस्थित राहून माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. माऊलींच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.*

वारकरी संप्रदायाच्या शतकानुशतके अखंड सुरू असलेल्या या पवित्र परंपरेत नीरा येथील निरास्नान सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत अभ्यंग स्नान घालण्याची ही परंपरा लाखो वारकऱ्यांसाठी भक्तीचा आणि अध्यात्माचा उत्सव मानली जाते. याच पवित्र वातावरणात मुनगंटीवार यांनी सपत्नीक माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेत भक्तिभावाने नम्र अभिवादन केले.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांची अधिकाऱ्यांशी चर्चा, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी असोलामेंढा प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय

“ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि हरिनामाच्या मंगलमय वातावरणाने नीरा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. दत्त घाटावर लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या दिव्य सोहळ्याने मुनगंटीवार यांनाही भावविभोर केले. वारकऱ्यांच्या मुखी अखंड विठ्ठलनाम, डोळ्यांत भक्तीचा ओलावा आणि सेवाभावाने भारलेले वातावरण हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे जिवंत दर्शन घडवणारे ठरले.

यावेळी मुनगंटीवार यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या भक्तिभावाला वंदन केले. माऊलींच्या चरणी समाजात प्रेम, सद्भाव, सेवा आणि मानवतेची भावना अधिक दृढ व्हावी, तसेच प्रत्येकाच्या जीवनात विठ्ठलभक्तीचा अखंड आशीर्वाद लाभावा, अशी प्रार्थना त्यांनी केली.

error: Content is protected !!