व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Mohan mate: भाजपचे नेते खोटे बोलत नाहीत, मोहन मतेंनी पहिले कौतुक केले,...

Mohan mate: भाजपचे नेते खोटे बोलत नाहीत, मोहन मतेंनी पहिले कौतुक केले, मग मागणी केली

Mla Mohan mate demands nitin gadkari, devendra Fadnavis for metro in south nagpur : दक्षिण नागपुरातील मेट्रोसाठी आमदाराचे गडकरी, फडणवीसांना साकडे

Nagpur भाजपचे नेते आणि आमचे नेतृत्व कधीही खोटे बोलत नाही. तुम्ही दक्षिण नागपूरला उड्डाणपूल दिला, त्याबद्दल धन्यवाद. पण आता पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना दक्षिण नागपूरलाही मेट्रो रेल्वे द्या, अशा शब्दांत दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी लावून धरली आहे.

दक्षिण नागपूरच्या विकासावर बोलताना आमदार मोहन मते यांनी नागपूर सुधार प्रन्यासवर जोरदार हल्लाबोल केला. नागपूर सुधार प्रन्यासच्या धोरणांमुळे शहराचे नुकसान झाले असून अनधिकृत ले-आऊट निर्माण झाले आहेत. त्यामुळेच आज अनेक भागांत तीव्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी दक्षिण नागपूरला आणखी काही पूल द्यावेत,असे आवाहन मते यांनी केले.

Vijay wadettiwar : ओबीसी कॉलमसाठी चलो दिल्ली, वडेट्टीवार यांचा इशारा

आपल्या भागातील विकासकामांचा लेखाजोखा मांडताना त्यांनी सांगितले की, जांबुदीप नाला सुधारणेसह क्रीडा स्टेडियमसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. एकेकाळी दुर्लक्षित राहिलेला दक्षिण नागपूर परिसर आता भाजप सरकारच्या पुढाकाराने आणि निधीमुळे झपाट्याने विकसित होत आहे. उर्वरित पायाभूत सुविधा आणि मेट्रोचे जाळे मिळाल्यास दक्षिण नागपूरचा कायापालट होईल,असा ठाम विश्वास मोहन मते यांनी व्यक्त केला. दिघोरी ते इंदोरा उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

error: Content is protected !!