Breaking

Nitin Gadkari, Devendra Fadnavis : मनपाच्या ‘टाऊन हॉल’ने वाढवले आयुक्तांचे टेंशन !

The municipal commissioner inspected the construction work of the Town Hall : कामाची पाहणी; वेळेच्या आत काम पूर्ण करण्याच्या सूचना

Nagpur नागपूर महानगरपालिकेचा Nagpur Municipal Corporation टाऊन हॉल Town Hall महालमध्ये अगदी वर्दळीच्या ठिकाणी आहे. तरीही अनेक वर्षं त्याठिकाणी महानगरपालिकेच्या सभा, सभेवर येणारे मोर्चे होत राहिले. मात्र, हा हॉल जुना झाल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवा हॉल बांधण्याची सूचना केली. गडकरी आणि फडणवीस यांचे कामावर सातत्याने लक्ष आहे. त्यामुळ महानगरपालिका आयुक्तांचे टेंशन चांगलेच वाढले आहे.

मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी अलीकडेच टाऊन हॉलच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. नागपूर महानगरपालिकेद्वारे महाल येथे श्रीमंत राजे रघूजीराव भोसले सभागृह (टाऊन हॉल) नवीन इमारतीचे बांधकाम होत आहे. तसेच मनपाकडून बुधवार बाजार व्यापारी संकुलाचेही बांधकाम करण्यात येत आहे. या प्रकल्पांच्या उभारणीत येत असलेल्या अडचणींची माहिती आयुक्तांनी अलीकडेच घेतली.

The Dindori project has been stalled for six years : व्वाह रे सरकार! कंत्राटदारावर मेहरबान; प्रकल्पग्रस्तांचे काय?

या दोन्ही कामाची पाहणी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली. यावेळी कार्यकारी अभियंता अश्विनी येलचटवार, राजेंद्र राठोड, अनिल गेडाम, सचिन रक्षमवार, उपअभियंता राजीव गौतम, कनिष्ठ अभियंता देवचंद काकडे, कनिष्ठ अभियंता पुरुषोत्तम फाळके, ‘टाउन हॉल’ प्रकल्पाचे सल्लागार आर्किटेक्ट रमाकांत भुतडा, कंत्राटदार प्रफुलवेद इन्फ्राचे प्रफुल्ल देशमुख, बुधवार बाजार प्रकल्पाचे स्ट्रक्चरल इंजिनिअर पी.एस. पाटणकर, आर्कीटेक्ट अनुराग पशिने उपस्थित होते.

समस्या सोडविण्यासाठी Strategic Committee

टाऊन हॉल आणि मनपा बुधवार बाजार व्यापारी संकुलाचे नव्याने निर्माण सुरू आहे. या बांधकामात अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या समस्या सोडविण्यासाठी लवकरात लवकर ‘स्ट्रॅटेजिक कमिटी’ची बैठक आयोजित करा, असे निर्देश मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.

The wait for Somalwada RUB is over : नागरिकांनी केले अंडरपासचे ‘उद्घाटन’ !

असा असेल टाऊन हॉल
६८०८.१३ चौरस मीटर भूखंडामध्ये नवीन टाउन हॉलचे बांधकाम केले जात आहे. इमारतीमध्ये दोन तळमजले अधिक चार मजले असणार आहेत. एका तळमजल्यावर अतिविशेष व्यक्ती प्रवेश आणि पार्कींग असेल. दुसऱ्या तळमजल्यावर मनपा सभागृहाचे सदस्य आणि अधिकारी यांचे प्रवेश, कार्यालय परिसर आणि पार्कींग असेल. पहिल्या मजल्यावर १५५ क्षमतेचे सभागृह असेल.

दुसऱ्या माळ्यावर सभागृह
दुसऱ्या मजल्यावर २८८ सदस्य आणि ५० अधिकारी यांची आसन व्यवस्था असलेले मुख्य सभागृह, महापौर, आयुक्त, उपमहापौर, विरोधी पक्षनेते यांचे कार्यालय असेल. तिसऱ्या मजल्यावर अभ्यागत, पत्रकार यांच्यासह २१० व्यक्ती आसन क्षमतेची गॅलरी असेल आणि चौथ्या मजल्यावर कार्यालये, कॅन्टीन आणि मोकळे छप्पर असेल. या सर्व कामातील बारकावे आयुक्तांनी जाणून घेतले.