Breaking

Prahar janshakti party : ३९ लाख ९ हजार रुपये वेतन थकले; थाळी वाजवून नोंदवला निषेध

Strike for unpaid wages of contract employees : कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी प्रहारचा ठिय्या; रुग्णालय प्रशासनाचे लेखी आश्वासन

Amravati अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सुमारे ३९ लाख ९ हजार रुपये इतके वेतन हिंदुस्थान सिक्युरिटी अ‍ॅण्ड इंटेलिजन्स सर्व्हिसेस या एजन्सीने थकीत ठेवल्याच्या निषेधार्थ गुरुवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ‘थाळी वाजवा’ आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन थेट जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस) यांच्या दालनात पाच तास ठिय्या देत पार पडले. अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

हे आंदोलन वसू महाराज यांच्या नेतृत्वात इर्विन चौकात सुरू झाले. सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनीही यामध्ये सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे यांनी सांगितले की, “या कर्मचाऱ्यांचे जुलै २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील वेतन थकवण्यात आले आहे. यासंदर्भात २०२३ पासून वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय सफाई आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी वेतन अदा करण्याचे निर्देश दिले होते, तरीही आरोग्य यंत्रणेने दुर्लक्ष केले.”

Harshawardhan Deshmukh : मोर्शीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन!

यासंदर्भात वसू महाराज यांनी आरोग्य यंत्रणेवर कडक टीका करत कर्मचाऱ्यांच्या पिळवणुकीचा मुद्दा उपस्थित केला. अखेर जिल्हा शल्यचिकित्सकांनी पुढाकार घेत लेखी आश्वासन दिले की, “वेतन मंजुरीसाठी जिल्हा लेखाव्यवस्थापक स्वतः मुंबई येथे जाऊन पाठपुरावा करतील. त्यांच्या सोबत प्रहार संघटनेचा एक प्रतिनिधीही असेल.”

Amravati airport : उड्डाण घेतले, पण गोंधळ संपला नाही!

या आंदोलनावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे छोटू वसू महाराज, नितीन शिरभाते, प्रशांत शिरभाते, मंगला खंडारे, सुरेश धनविजय, अर्चना डहाके, कीर्ती गणवीर, अलका इंगळे, संगीता गवळी आदी उपस्थित होते.