Deepak Kesarkar : ‘हिंदी’च्या नावाने विरोधक शेकताहेत पोळी!

Marathi will not be insulted in Maharashtra : महाराष्ट्रात मराठीचा अपमान होऊ देणार नाही; शालेय शिक्षण मंत्र्यांची स्पष्टोक्ती

Mumbai सध्याच्या शैक्षणिक धोरणात बारावीपर्यंत मराठी आणि इंग्रजी भाषा सक्तीच्या आहेत. राज्यात मराठीचा सन्मान होणार नाही, हा आरोप पूर्णपणे निरर्थक आहे. मराठीचा अपमान महाराष्ट्रात शक्यच नाही. विरोधक आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी विरोध करत आहेत, असा आरोप शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केला.

हिंदी भाषेचे ज्ञान वाया जाणार नाही. उलट विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षांना सामोरे जाण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करणे योग्य नाही, असंही केसरकर म्हणाले. इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आहे. सक्ती हटवण्यासाठी आंदोलने करण्यापर्यंत परिस्थिती आली आहे. ही सक्ती महायुती सरकारच्या चांगलीच अंगलट येताना दिसत आहे. सरकार या वादावर पडदा टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी एक प्रयत्न केला होता. आता केसरकर यांनीही भूमिका मांडली आहे.

NCP Ajit Pawar Politics : तटकरेंना अॅलर्जी ‘संग्राम’ नावाची की मराठ्यांची ?

दीपक केसरकर म्हणाले, शालेय शिक्षणात हिंदी भाषा ही काही आजची नाही, तर पूर्वीपासूनच आहे. इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवीसाठी हिंदी भाषा सक्तीची होती आणि नव्या शेक्षणिक धोरणाचा स्वीकार केल्यानंतर सहावीपासून विद्यार्थ्यांना अन्य भाषांचा पर्याय निवडण्याची सवलत देण्यात आली. यामध्ये हिंदी, जर्मन आणि संस्कृत भाषांचा पर्याय उपलब्ध आहे. आता पहिली ते पाचवीसाठी हिंदी भाषा देण्यात आली आहे. यामध्ये काहीही अडचण येणार नाही. कारण मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा देवनागरी लिपीतील आहेत.