Meeting in Mumbai on Tuesday for Jigaon project in Buldhana : विदर्भातील जलसिंचनाच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प
Nagpur : विदर्भाच्या खारपाण पट्ट्यातील आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील जिगाव हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे बुलढाण्यासह अकोला जिल्ह्यातील गावांना फायदा होणार आहे. औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्याचे शाश्वत स्त्रोत यामुळे उपलब्ध होणार आहेत. जलसिंचनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पातील अडथळे आता दूर करण्यात येतील. त्यासाठी येत्या मंगळवारी (२९ एप्रिल) मुंबईत आढावा बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
नागपुरातील सदरमधील नियोजन भवन येथे नुकतेच जिगाव प्रकल्पाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सादरीकरणाद्वारे जिगाव प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रकल्पाची सद्यस्थिती, भूसंपादन व पुनर्वसन आदी माहीती जलसंपदा विभागाकडून महसूल मंत्र्यांना देण्यात आली. पश्चिम विदर्भातील दोन जिल्ह्यांचे भवितव्य अवलंबून असलेला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वेगाने काम केले जाईल, असे यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
Chandrashekhar Bawankule : वडेट्टीवारांच्या आरोपाला बावनकुळेंचे उत्तर; म्हणाले, श्रेयवाद नाहीच..!
नियोजन भवन येथील बैठकीला अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील, सहआयुक्त वैशाली पाथरे, उच्च न्यायालयाचे सरकारी अभियोक्ता देवेन चव्हाण, उच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे सचिव अनिलकुमार शर्मा यांच्यासह संबंधित यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Jammu Kashmir terrorist attack : काश्मीरचं सौंदर्य घायाळ करणारं, पण आता ‘घायाळ’ व्हायला जाणार कोण ?
बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील जिगाव हा प्रकल्प विदर्भातील जलसिंचनाच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प आहे. यामुळे शेती उत्पादनात वाढ आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. नियमानुसार या प्रकल्पातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.








