Congress leader Harshvardhan Sapkal criticizes the ruling party over the ED office fire : पुरावा राहू नये म्हणून ईडीने आपल्या कार्यालयाला आग लावून दिली
Buldhana : ज्या ईडीचा वापर सत्ताधाऱ्यांनी केवळ आणि केवळ राजकीय कट कारस्थाने रचण्यासाठी केला. गेल्या १० वर्षांत विरोधकांचा आवाज दाबण्याकरिता, विरोधकांना जेलमध्ये टाकण्याकरिता, पक्षांतर करवण्याकरिता ईडीच्या कार्यालयाचा वापर सत्ताधाऱ्यांनी केला आणि ईडी कार्यालय पेटवून आता आमच्याकडे कुठलेच पुरावे नाहीत, असा कांगावा करण्यासाठी ते मोकळे झाले, अशी कडवी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
गत १० वर्षात ईडीचा जो गैरवापर सत्ताधाऱ्यांनी केला, त्याचा कुठलाही पुरावा राहू नये म्हणून ईडीने स्वतःत आपल्या कार्यालयाला आग लावून दिली. राजकीय कारस्थाने कशी करायची असतात आणि सरकारी संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना कसं संपवायचं असते, याचा उत्कृष्ट नमूना म्हणजे ईडीच्या कार्यालयाला लावलेली आग आहे, असे सपकाळ म्हणाले.
Ladki Bahin Yojana : १५०० रुपयांत बहीणी खुश आहेत का? ‘स्थानिक’ निवडणुकांत दिसेल..!
‘सब गोलमाल है भाई सब गोलमाल है, सीधे रस्ते की ये टेढीसी चाल हे, सब गोलमाल है..’, या गिताचे बोल म्हणत हर्षवर्षन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उभाठाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यासारख्या कितीतरी नेत्यांना ईडीचा वापर करून जेलमध्ये टाकले. याशिवाय कितीतरी नेत्यांना ईडीचा धाक दाखवून पक्षांतर करण्यास सत्ताधाऱ्यांनी भाग पाडले. ही बाब ईडीने स्वतःच आपल्या कार्यालयाला आग लावल्यानंतर सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ झाली असल्याचे सपकाळ म्हणाले.
Pakistani citizen : शिंदे म्हणतात १०७ पाकिस्तानी सापडत नाही, तर फडणवीसांचा वेगळाच दावा !
या देशातील जनता तर हे यापूर्वीच जाणून होती. पण ईडीने आपलेच कार्यालय पेटवून दिल्यानंतर जनतेला पुरावा मिळालेला आहे. स्वतः ईडीनेच हा पुरावा उपलब्ध करून दिलेला आहे. याशिवाय देशात ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यामागे सरकारचा उद्देश काय आहे, हेसुद्धा एव्हाना जनतेच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनताच सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल, असेही हर्षवर्षन सपकाळ म्हणाले.








