Breaking

Navneet Rana : हिंदुस्थानावर डोळे वटाराल, तर डोळेच काढून घेऊ

Former MP raises slogans against Pakistan : आमदार रवी राणांच्या वाढदिवसाला नवनीत राणां

Amravati भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी हातात तलवार घेत पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “हिंदुस्थानावर डोळे वटाराल, तर डोळेच काढून हातात देऊ,” असा इशारा देत त्यांनी ‘हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.

आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीतील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नवनीत राणा यांनी हातात तलवार घेत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली.

Navneet Rana : नवनीत राणा म्हणाल्या, ‘एकवेळ बंदुकीची गोळी खाईन, पण…’

पाकिस्तानच्या नेत्यांवर टीका करताना नवनीत राणा म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भुट्टोसारख्यांना चांगलाच धडा शिकवतील. अख्ख्या पाकिस्तानात कोणीही आता भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही. भारतात एक वाघ राहतो, त्याचे नाव नरेंद्र मोदी आहे. पाणीच काय, तुमचे दानापाणीही बंद करू.”

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांच्या वक्तव्यावर त्या म्हणाल्या, “भारताची ताकद कमी लेखण्याची चूक पाकिस्तानने करू नये.”

World Audio Visual Entertainment summit: महाराष्ट्र दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत !

यावेळी नवनीत राणा यांनी आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेवरही भर दिला. “माझा लहान मुलगा म्हणतो, मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. गोळी खाईन पण कुराण वाचणार नाही,” असे सांगत त्यांनी आपल्या कुटुंबातील संस्कारांची उदाहरणे दिली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत नवनीत राणा म्हणाल्या, “दहशतवाद्यांनी जात विचारून हत्या केली नाही. त्यांनी विचारले, ‘तुम्ही हिंदू आहात का?’ आणि हिंदूंवर गोळीबार केला. त्यामुळे जात-पात बाजूला ठेवून सर्व हिंदूंनी एकत्र येणे आज काळाची गरज आहे.”