Protest for loan waiver, guaranteed price, electricity bill waiver : कर्जमाफी, हमीभाव, वीजबिल माफीसह १० मागण्यांसाठी आंदोलन
Buldhana शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आज, २ मे रोजी सकाळी ११ वाजता बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी केले आहे.
गेल्या दोन वर्षांत झालेल्या नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील घसरण आणि पीक विम्याचे रखडलेले वाटप यामुळे राज्यातील सुमारे ६८% शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. “हे केवळ शेतकऱ्यांचे नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचे संकट आहे. सरकारचे डोळे उघडण्यासाठी हा संघर्ष आवश्यक आहे,” असं ॲड. जयश्री शेळके म्हणाल्या.
Prahar Janshakti : घागर पूजन करून नगर परिषद प्रशासनाचा निषेध!
१००% कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, ग्रामीण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करावा,सोयाबीन, कापूस, तूर, मका इत्यादींना हमीभाव मिळावा,२०२३ व २०२४ चा पीकविमा तात्काळ द्यावा,तुषार व ठिबक सिंचनाचे अनुदान वितरित करावे,शेतमालावर आधारित उद्योग उभारावेत,वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी तार कुंपण द्यावे,शेतीसाठी वीजबिल माफ करावे व मोफत वीज द्यावी,सोयाबीनसाठी खुल्या बाजारातील भावफरक भरून द्यावा (रु. २,००० प्रति क्विंटल),शेतीमाल खरेदीसाठी नाफेडची क्रय प्रक्रिया पुन्हा सुरु करावी, अशी मागणी असेल.
Reshuffle in Congress body : शेगाव तालुका व शहराध्यक्ष पदासाठी लॉबिंग शिगेला
राजकीय संधीसाधू मोर्चा?
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवानंतर पक्षाकडून नवीन उर्जा घेऊन रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. हा मोर्चा राजकीय ताकद दाखवण्याचे माध्यम ठरणार का, याकडेही लक्ष लागले आहे.