Breaking

Dilip Sananda : सानंदांच्या पोस्टरवर फडणवीस, शिंदे, पवार!

 

Congress leader likely to join Ajit Pawar NCP : काँग्रेसला ठोकणार रामराम?; अजित पवार गटात प्रवेशाची शक्यता

Buldhana “जब तक जिंदा हूँ, काँग्रेस का परिंदा हूँ…” असं ठामपणे म्हणणारे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा रंगली आहे. ४ मे किंवा त्यानंतर कोणत्याही क्षणी त्यांचा अजित पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

सानंदा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खामगाव शहरात लागलेले पोस्टर आणि प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींनीच चर्चेला अधिक बळ दिलं आहे. राणा फाउंडेशनतर्फे झालेल्या आंदोलनासाठी वापरलेल्या बॅनरवर महायुतीतील नेत्यांचे — मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो झळकले, मात्र काँग्रेसचे एकही नेते नव्हते. यावरून सानंदा यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय जवळपास घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

Maharashtra Cabinet : सुमार कामगिरी करणाऱ्या खात्यांना चांगले रेटिंग, थोरातांची टोलेबाजी !

१९९९, २००४ आणि २००९ मध्ये सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले सानंदा काँग्रेसमध्ये मजबूत नेता म्हणून ओळखले जायचे. स्व. विलासराव देशमुख यांचे ते जवळचे होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर सानंदा यांचा पक्षात एकाकीपणा वाढला. २०१९ मध्ये त्यांनी स्वतःच्या जागी ज्ञानेश्वर पाटलांना उमेदवारी दिली, पण पराभव झाला. यानंतर काँग्रेसमध्ये त्यांना संघटनात्मक पाठबळ लाभले नाही.

२०२४ च्या निवडणुकीत सानंदा यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली तरी अंतर्गत गटबाजी व संघटनेचा अभाव यामुळे त्यांचा पराभव झाला. त्यामुळे पुढची ५ वर्षं विरोधात राहणं त्यांच्यासारख्या व्यावसायिक राजकारण्याला परवडणारे नसल्याने त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली.

Women and Child Development : फडणवीसानी उलटा क्रम लावला की काय ?

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, सानंदा यांनी महायुतीत प्रवेश करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र भाजपमध्ये त्यांना घेण्यास आमदार आकाश फुंडकर यांनी तीव्र विरोध केला. शिंदे गटातही प्रवेशासाठी त्यांनी प्रयत्न केले. गायकवाड यांच्या फार्महाऊसवर शिंदे यांची भेट घेतल्याचं समजतं. मात्र, फुंडकरांच्या दबावामुळे तिथेही प्रवेश अडकल्याचं बोललं जातं.

अखेर सानंदा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोर्चा वळवला. पक्ष विस्ताराला प्राधान्य देणाऱ्या अजित पवारांनी त्यांना ग्रीन सिग्नल दिल्याचं वृत्त आहे. बुलडाणा जिल्ह्यातील राजकारणात सानंदा यांच्यासारख्या अनुभवसंपन्न नेत्यामुळे अजित पवार गट अधिक बळकट होऊ शकतो.