Breaking

Shivsena Udhhav Balasaheb Thackrey : अदानी-अंबानींची हजारो कोटींची कर्जमाफी होते, शेतकऱ्यांची का नाही?

 

Tractor march jams Buldhana; Thousands of farmers on the road : ट्रॅक्टर मोर्चाने बुलढाणा जाम; हजारो शेतकरी रस्त्यावर

Buldhana शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज दिनांक २ मे रोजी बुलढाण्यात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. शेकडो ट्रॅक्टर आणि हजारो शेतकऱ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण शहर ठप्प झाले, तर सरकारच्या विरोधात घोषणांनी शहर दणाणून गेले.

मोर्चाची सुरुवात जिजामाता प्रेक्षागृह परिसरातून झाली. संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आले.

या प्रसंगी आयोजित सभेत जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर म्हणाले, “कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. अदानी-अंबानींच्या हजारो कोटींची कर्जमाफी होते, मग शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसे नाहीत का?” खेडेकर यांनी सरकारला झोपेचं सोंग घेणारे ठरवत,”हे आंदोलन हे चेतावणी आहे, कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा दिला.

Shivsens uddhav Balasaheb Thackrey : शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा

शिवसेना प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. “शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. निवडणूकपूर्व आश्वासनांची पूर्तता झाली नाही. हे सरकार फक्त मोठ्या उद्योजकांचं कर्ज माफ करतं आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतं,” असा घणाघात त्यांनी केला.

शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी सरकारवर दिशाभूल केल्याचा आरोप करत, “शेतकऱ्यांना भाव नाही, पाणी नाही, रोजगार नाही. शिवसेना सातबारा कोरा करून दाखवेल,” असे ठामपणे सांगितले.

Congress Tractor Morcha : काँग्रेसचा आज ट्रॅक्टर मोर्चा, सरकारी धोरणांचा करणार निषेध!

आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले, “महायुतीचे सरकार फक्त खोटी आश्वासने देते. नाफेड खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांचे माल पडून आहे. हे सरकार खोटारडे आणि फसवे आहे.”

या मोर्चात प्रा. नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, जयश्री शेळके, जालिंदर बुधवत, दत्ता पाटील, संदीप शेळके, डी.एस. लहाने, नंदू कऱ्हाडे, विजयाताई खडसन आदींसह जिल्हा व तालुका पातळीवरील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, किसान सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.