Indications to accelerate development projects : अकोला भेटीत दिले गती देण्याचे संकेत, भाजप पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
Akola अकोला जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आशेने बघितले जात आहे. त्यादृष्टीने त्यांनी मंगळवारी दिलेल्या भेटीमधून संकेतही दिलेत. विशेष म्हणजे गडकरी केवळ पाच मिनिटांसाठी आले, पण विकास प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात आश्वस्त केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी एका खासगी कार्यक्रमानिमित्त मंगळवारी अकोल्यात दाखल झाले. शिवनी विमानतळावर भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून जिल्ह्यातील रस्ते विकास प्रकल्पांना गती देण्याचे संकेत दिले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत ते खासगी कार्यक्रमासाठी रवाना झाले.
गडकरी यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ४ हजार कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करून रस्ते व पूल विकास प्रकल्पांना चालना दिली आहे. यामुळे अकोला जिल्ह्यातील दळणवळण सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे. वेळेची बचत आणि आर्थिक प्रगतीस गती मिळणार आहे.
MLA Randhir Sawarkar : खरीप हंगामात बियाणे-खतांचा काळाबाजार रोखा
अकोला-खामगाव महामार्ग, शेगाव-बाळापूर मार्ग, गांधीग्राम परिसरातील पूल, एमआयडीसी अंतर्गत अंडरपास आणि मिनी बायपास या प्रकल्पांना केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मागण्या तत्कालीन खासदार संजय धोत्रे, विद्यमान खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार संजय कुटे व आमदार वसंत खंडेलवाल यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे मांडल्या होत्या.
Balwant Wankhede Yashomati Thakur : काँग्रेसचा जनता दरबार, पण समस्या कोण सोडवणार?
गडकरी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल, माधव मानकर, ॲड. देवाशिष काकड, पवन महल्ले आदी उपस्थित होते.