Breaking

Air Strike : काँग्रेसच्या त्या नेत्यावर नेटकऱ्यांचे ‘एअर स्ट्राईक’!

Controversial post by Congress leader on Air Strike : लष्कराच्या कारवाईला ‘टुच्चेपणा’ म्हणणे आले अंगलट

Nagpur पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पर्यटक व स्थानिक नागरिकांना प्राण गमवावे लागले. त्यानंतर संपूर्ण देशातून तीव्र पडसाद उमटले. पाकिस्तानला उत्तर द्यायलाच पाहिजे, अशी भूमिका विरोधकांनीही घेतली. मात्र, त्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक विधान करून वाद ओढवून घेतला होता. तोच प्रकार आता नागपुरातील एका काँग्रेस नेत्याने केला आहे. लष्कराने केलेल्या एअर स्ट्राईकला ‘टुच्चेपणा’ म्हणणे त्याला चांगलेच भोवले आहे.

Shivsena Eknath Sinde : आम्ही प्रवेश मागितलाच नाही, मग यादीत नाव कसे आले?

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचे भारताने ऑपरेशन सिंदूरच्या Operation Sindoor माध्यमातून प्रत्युत्तर दिले. देशभरात कारवाईचे समर्थन करत जल्लोष करण्यात आला. अगदी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनीदेखील सैन्याच्या कारवाईचे स्वागत केले. मात्र, काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नागपुरातील पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राइकला टुच्चेपणा म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
युगलकिशोर विदावत असे संबंधित स्थानिक पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश विचार विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच असंघटित कामगार सेलचे शहराध्यक्ष आहेत. बुधवारी मध्यरात्रीनंतर वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर विदावत यांनी सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास फेसबुकवर पोस्ट टाकली. त्यात त्यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी एअर स्ट्राइकसारखा ‘टुच्चेपणा’ दाखविणार नाहीत’, असे लिहिले.

Suicide in Gondia : तरुणाची वाढदिवसालाच केली आत्महत्या!

‘आशा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एअर स्ट्राइकसारखा टुच्चेपणा दाखविण्याऐवजी स्व. इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे पाकिस्तानचे दोन तुकडे करून देशाच्या सैन्याचे नाव जगात उंचावतील’, अशी त्यांची पूर्ण पोस्ट होती. मात्र एअर स्ट्राइकला टुच्चेपणाची उपमा दिल्यामुळे नेटिझन्समध्ये नाराजीचा सूर उमटला. काहींनी यावरून काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली आहे. कमीतकमी देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत तरी राजकारण आणू नये अशी परखड भूमिका नेटिझन्सने विदावतच्या वॉलवर मांडली आहे.