Breaking

NCP Ajit Pawar : ४० वर्षे रिपाईचे काम केले, आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत!

RPI leader joins NCP : नरहरी गवई यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

Buldhana आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील बहुजन चळवळीतील ज्येष्ठ नेते नरहरी गवई यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर शेकडो कार्यकर्त्यांसह गवई यांनी पक्षप्रवेश केला.

गवई यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला जिल्ह्यात नवसंजीवनी मिळाल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे अनेकांचे लक्ष लागले होते.
या पक्षप्रवेश सोहळ्यात अजित पवार यांनी विदर्भात संघटन मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. “नवीन कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळ दिले जाईल आणि त्यांना सत्तेतही संधी मिळेल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

Water crisis : मेहकरात नळ बंद; टँकरचे भाव वाढले!

गवई यांनी गेल्या ४० वर्षांत रिपब्लिकन चळवळीत सक्रिय कार्य केले आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले गवई २०१४ मध्ये मेहकर विधानसभेची निवडणूक युतीच्या तिकिटावर लढवली होती. त्या निवडणुकीतही त्यांना उल्लेखनीय मते मिळाली होती.

Chandrashekhar Bawankule : ४२ एकर वनजमिनीवर डल्ला; अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

गवई यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामध्ये बाळासाहेब दामोदर, दिलीपभाऊ वानखेडे, आम्रपाल वाघमारे, नितीन कांबळे, भागवत साळवे, सुरेश खंडारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. या वेळी पालकमंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, प्रवक्ते महेश शिंदे, शंतनू बोद्रे, टी. डी. अभीरे पाटील आदींची उपस्थिती होती.