Checking of ineligible ration cards : ३१ मे पर्यंत दुकानदारांना अहवाल देण्याचे आदेश
Buldhana राज्य सरकारच्या आदेशानुसार अपात्र शिधापत्रिका धारकांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी रास्त धान्य दुकानदारांना ३१ मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार अजित दिवटे यांनी दिले आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यात सध्या १३५ रास्त धान्य दुकानदार कार्यरत आहेत. अजूनही बोगस शिधापत्रिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे अंत्योदय अन्न सुरक्षा योजना व प्राधान्य कुटुंब योजना या दोन गटांतील लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
ही मोहीम २९ जून २०१३ च्या शासन निर्णय व १ फेब्रुवारी २०१४ च्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राबविण्यात येत आहे. तसेच लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण) आदेश २०१५ नुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया म्हणून वर्षभर चालू राहणार आहे.
India – Pakistan War : पाकिस्तानने केलेले सर्व ड्रोन हल्ले भारताने हाणून पाडले !
१ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून, लाभार्थ्यांना अर्जाचे फॉर्म विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिधापत्रिका धारकांनी रहिवासी पुरावा व आवश्यक माहितीसह आपले फॉर्म भरून संबंधित रास्त धान्य दुकानदाराकडे सादर करणे बंधनकारक आहे.
या मोहिमेमुळे खोट्या लाभार्थ्यांची नोंदणी कमी होऊन, खऱ्या गरजूंपर्यंत धान्य पोहोचविण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.