Breaking

Job creation : केरळ लॉटरी बदलवेल महाराष्ट्राचे अर्थकारण; मुनगंटीवारांनीच सुचवला होता उपाय !

Mungantiwar suggested the solution, Kerala lottery will change Maharashtra’s economy : रोजगार निर्मिती आणि सामाजिक कल्याणाचाही प्रभावी स्त्रोत

Thiruvananthapuram : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसा नाही, ही बाब अर्थसंकल्पीय अधिवेशनात अधोरेखीत झाल्यानंतर राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार उद्विग्न झाले होते. पैसा नाही तर उत्पन्न वाढवा, अशी सूचना त्यांनी सभागृहाला केली होती आणि महाराष्ट्र राज्याचा महसूल वाढवण्यासाठी केरळ लॉटरीच्या धरतीवर महाराष्ट्रात केरळसारखी लॉटरी सुरू करण्याचे सुचवले होते. तेव्हा त्यांनाच या समितीचे प्रमुख बनवण्यात आले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या निर्णयानुसार आमदार सुधीर मुनगंटीवार सध्या केरळ राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तेथे ते केरळ लॉटरी मॉडेलचा अभ्यास करत आहेत. काल (१९ मे) त्यांनी केरळचे अतिरिक्त मुख्य सचिव के. आर. ज्योतिलाल यांच्यासोबत महसूल वाढीच्या संधींबाबत चर्चा केली. यावेळी केरळची यशस्वी लॉटरी योजना महाराष्ट्राच्या अर्थकारणाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Ravi Rava Navneet Rana : स्वबळाच्या मुद्यावरून राणा दाम्पत्य आमने-सामने!

केरळ सचिवालयात झालेल्या बैठकीला त्यांच्यासोबत आमदार रोहित पाटील आणि इतर मान्यवर होते. केरळ लॉटरीच्या उपसंचालक स्टेफिना रॉड्रिग्ज यांनी आमदार मुनगंटीवार यांचे स्वागत केले. यावेळी आमदार मुनगंटीवार म्हणाले, ही योजना केवळ महसूल वाढीपुरतीच मर्यादित नाही, तर रोजगार निर्मिती आणि सामाजिक कल्याणाचाही प्रभावी स्त्रोत ठरेल. चर्चेदरम्यान लॉटरी योजनेतील पारदर्षकता, सामाजिक विश्वास आणि नागरिकांचा सक्रीय सहभाग यावर विशेष भर देण्यात आला.

MLA Randhir Sawarkar : कृषी विद्यापीठांमध्ये ‘मिलेट बोर्ड’ स्थापन करण्याची गरज

केरळ मॉेडेलमध्ये राज्यातील जनतेचा लॉटरी व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे आणि हीच गोष्ट त्यांच्या सातत्यापूर्ण यशामागची खरी ताकद असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी नमूद केले. बैठकीदरम्यान केवळ लॉटरीच नव्हे तर केरळचे एकूण आर्थिक स्वास्थ्य, मसाल्यांच्या व्यापाराचे महत्व आणि राज्याच्या ऐतिहासीक परंपरेचा आर्थिक विकासाशी असलेला संबंध या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.