Murder of Transgender in Dharangaon Shivar : धरणगाव शिवारात हत्या, अज्ञात व्यक्तीविराेधात गुन्हा
Khamgaon Murder मलकापूर तालुक्यातील धरणगाव शिवारात तृतीयपंथीची निर्घुन हत्या करण्यात आली. ही घटना ७ जानेवारी राेजी उघडकीस आली. या प्रकरणी पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तृतीयपंथींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मलकापूर तालुक्यातील धरणगाव-धोपेश्वर रस्त्यावर एक मृतदेह आढळून आला हाेता. याविषयी माहिती मिळताच मलकापूर पाेलिसांसह अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात घटनास्थळी दाखल झाले हाेते. मृतदेहाची पाहणी केली असता मृतक तृतीयपंथी असल्याचे दिसून आले. तर, त्याच्या गळ्यावर व डोक्यावर जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे ही हत्या असल्याचा पोलिसांचा कयास आहे. त्याचबरोबर मृतकाची हत्या करून मृतदेह धरणगाव शिवारात आणून टाकल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
sexual abuse of a child by Hostel superintendent : वसतीगृह अधीक्षकाच्या विकृतीचा कळस!
पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातील तृतीयपंथीयांना व इतर संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्या दृष्टीने पोलिसांची चौकशी व तपास सुरू आहे. घटनेबाबत वेगवेगळ्या शंका व्यक्त केल्या जात आहेत.
घटनेमुळे परिसरात उडाली खळबळ
एका तृतीय पंथीयाची हत्या झाल्याचे समाेर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह आढळलेल्या ठिकाणी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली हाेती़ मृतकाची ओळख पटली नसल्याने पाेलिसांसमाेर खुनाचा उलगडा करण्याचे माेठे आव्हान आहे. या प्रकरणी पाेलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच मलकापूर शहरातील तृतीयपंथीयांना ताब्यात घेवून त्यांची चाैकशीही सुरू केली आहे. मात्र, पाेलिसांना कुठलाही सुगावा लागला नाही.
Hair loss due to unknown reasons : तीन गावांमध्ये ‘टक्कल’ पडण्याची साथ!
खुनाच्या घटनांमध्ये वाढ
जिल्ह्यात गत काही दिवसांत खुनाच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टाेबरपर्यंत ४० खुनाची नाेंद करण्यात आली आहे. यावर्षी वर्षाच्या सुरूवातीलाच खुनाची घटना घडली आहे. हत्या कुणी केली, कशासाठी केली हे पाेलिसांच्या तपासात समाेर येणार आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटना स्थळावर धाव घेवून भेट दिली.