व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Mahayuti : शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाहीत !

Mahayuti : शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाहीत !

Congress leader Vijay Vadettiwar’s attack on the state government : लोकांच्या संकटाच्या काळात आम्हाला सरकारच दिसत नाही

Nagpur : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर संकट आणले आहे. या संकटाच्या काळात कुठल्याही मदतीची घोषणा सरकारने केली नाही. रब्बी धान खरेदीचीही घोषणा नाही. कुठे आहे सरकार? काय करत आहे? मुख्यमंत्री आणि उपमुख्यत्र्यांना शेतांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी वेळ नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. सत्ता आणि खुर्चीच यांना महत्वाची वाटते. शेतकऱ्यांना मदत करा, नाहीतर येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत हाच शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणा नाही, असा इशारा काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

विजय वडेट्टीवर यांनी आज (ता. २९) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, विखे पाटील काल (ता. २८) शेतकऱ्यांसाठी काहीतरी करताना दिसले. बाकी कुणीच दिसले नाही. अवेळी कोसळलेला पाऊत NDRF मध्ये बसत नाही, तर राज्य सरकारने SDRF मधून मदत करण्याची गरज आहे. पण कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. सरकार अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती आहे. त्यांना केवळ हींदू – मुस्लीम करून मतं मिळवायची आहेत. जनता खड्ड्यात गेली तरी चालेल. आम्हाला सरकारच दिसत नाही. मुंबईत पाऊस झाला, मेट्रो गळत होती, मेट्रोची पार ऐसीतैसी झाली आहे. उद्घाटनांच्या पलिकडे या सरकारला काही दिसत नाही.

Assurance Committee meeting : आयटी क्षेत्रात पब, बार आणि रेस्टॉरंट उभारले

परप्रांतातून होत असलेल्या दारू, गुटखा, रेती तस्करीवरूनही विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, याबाबत अनेक तक्रारी होत आहेत. आशिष देशमुख सत्तेतील आमदार आहेत. गृह खातं त्यांच्याकडे आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं आणि तस्करीचा बंदोबस्त करावा. मध्यप्रदेशातून दारू, गुटखा आणि रेतीची तस्करी होते. तिकडे कर कमी आहे. चोर चोरी करतात पण महाराष्ट्राचं वाटोळं होत आहे. त्यामुळे त्वरीत तस्करी थांबवावी.

error: Content is protected !!