Guardian Minister’s instructions to carry out public works promptly : पालकमंत्र्यांचे आदेश; जनसंवादात तक्रारी, अडचणींचा पाऊस
Nagpur राज्य शासनाकडून समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. प्रशासनाने योग्य आणि प्रभावी अंमलबजावणीतून त्यांचा पात्र नागरिकांना लाभ देताना त्यांच्या या संदर्भातील समस्याही तत्परतेने सोडवाव्यात, तसेच नागरिकांची शासन दरबारी प्रलंबित आणि नियमानुसार करता येणारी कामे दिरंगाई न करता, तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नागरिकांच्या स्थानिक स्तरावरील समस्यांचे तत्काळ निराकरण व्हावे व त्यांचे शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात रविवारी जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात एकूण २०७ नागरिकांनी आपल्या समस्या आणि निवेदने सादर केली. प्रशासनातील विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
Chandrashekhar Bawankule : पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध
विद्यार्थी, दिव्यांग, महिला, वृद्ध, तसेच समाजाच्या सर्व घटकांतील नागरिकांनी आज व्यक्तिगत, तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या सादर केल्या. समस्याग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेत, त्यांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले. विशेषतः आरोग्यविषयक समस्यांवर आज प्राप्त झालेल्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याबाबत त्यांनी सांगितले.
Chandrashekhar Bawankule : नेत्यांच्या मागे फिरून तिकीट मिळणार नाही
आजची सर्व निवेदने, समस्या आणि इतर प्रकरणांविषयी संबंधित विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा पुढील वेळी घेण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. योजनांचा लाभ देण्यात येणारे अडथळे, आरोग्यविषयक सुविधा, अतिक्रमण, अंगणवाडी आणि परिचारिकांच्या समस्या, वीज वितरण, कृषी, क्रीडा व महसूल संबंधित अनेक विषयांवर नागरिकांनी निवेदने देऊन बावनकुळे यांच्याशी संवाद साधला. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यावेळी उपस्थित होते.