व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sahitya Sammelan : 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला

Sahitya Sammelan : 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला

The 99th All India Marathi Literary Conference held at Satara -32 वर्षांनंतर मिळाला मान, पुण्याच्या बैठकीत निर्णय

Pune: ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या वर्षी साताऱ्यात होणार आहे. पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. तब्बल ३२ वर्षांनंतर साताऱ्याला पुन्हा एकदा या प्रतिष्ठेच्या संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. हे संमेलन साताऱ्यात चौथ्यांदा होत आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी, एक स्थळ निवड समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने निमंत्रक स्थळांना भेट दिल्यानंतर आज झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला. निवड समितीच्या निर्णयावर महामंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केल्याची माहिती अध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी प्रसार माध्यमांना दिली.

Bachhu Kadu Hunger Strike: काहीही झाले तरी मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाहीच

या बैठकीला उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाहक सुनिता राजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह सर्व घटक सदस्य आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 99 वे संमेलन आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला मिळाला आहे .

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी यंदा 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार असल्याची घोषणा केली.ते म्हणाले, साताऱ्याला 32 वर्षांनंतर संमेलन आयोजनाचा मान मिळाला. यापूर्वी 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झाले होते . गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा साताऱ्याला साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होती.

US: अमेरिकेत आणखी एका शहरात हिंसाचार,118 जणांना अटक

साताऱ्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन आहे .1878 मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरू केल्यानंतर 3 मे 1905 साली रघुनाथ पांडुकर करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते . 1962 मध्ये नवी गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 44 वे तर 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्या आता झाले होते .

नियोजित संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम हे आहे. योगायोग असा की 1993 साली 66वे संमेलन इथेच झाले होते. हे स्टेडियम 14 एकरात असून तिथे मुख्य मंडप, 2 इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर छोटे कार्यक्रम करण्यासाठी 3 सभागृहे उपलब्ध आहेत. स्टेडियममध्ये 25,000 प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी आहे. हे स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर असून शहराच्या मध्यभागी असल्याने शहरातील आणि बाहेरून येणाऱ्या साहित्य रसिकांची सोय होणार आहे.

Water Council in Nagpur : भाकित खरे ठरले, पाण्यासाठी युद्धाचे दिवस आले !

स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस पोलिस परेड ग्राउंडची 8 एकर जागा असून तिचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे. या संमेलनासाठी मार्गदर्शन समिती गठीत करण्यात आली असून त्यात प्रा मिलिंद जोशी, गुरय्या स्वामी, सुनिता राजे पवार, विनोद कुलकर्णी, प्रदीप दाते, दादा गोरे आणि डॉ उज्ज्वला मेहेंदळे यांचा समावेश आहे.

error: Content is protected !!