Former Chief Minister to visit Bachchu Kadu’s protest : अन्नत्याग आंदोलनच्या समर्थनार्थ जलसमाधी आंदोलन
Amravati शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे रविवारीपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आंदोलनस्थळी भेट देत बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली होती. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील भेट देणार आहेत.
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ विश्रोळी धरण येथे जलसमाधी आंदोलन देखील सुरू झाले आहे, हे विशेष. राजेश टिकेत यांनी आंदोलनाला भेट दिल्यानतंर सरकारवर टीका केली. ‘आम्ही दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात लढत आहोत; पण सरकार शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतेय.’
Bachhu Kadu Hunger Strike: काहीही झाले तरी मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाहीच
भाजपने अनेक राज्यांतील पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण केलं आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पक्षातही फूट पाडली. आमची लढाई ही विचारधारेची आहे. धर्म आणि जात यांच्या आधारावर शेतकरी संघटनांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आपल्याला शेतकरी चळवळीला अधिक बळकटी द्यावी लागेल, असंही ते म्हणाले.
Neelesh Rane vs NItesh Rane: नीलेश राणेंचा बंधू नितेशला ‘सबुरीचा’ सल्ला
टिकैत यांनी प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. “बच्चू कडू हे आज नव्हे, तर अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत आहेत. आमदार असताना त्यांनी विधानभवनात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला आणि आता आमदार नसतानाही ते शेतकरी, दिव्यांग यांच्यासाठी आंदोलन करत आहेत. सत्ताधारी सरकार आंदोलनकर्त्यांना आणि विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे. धर्माच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचं काम सुरू आहे. अशा परिस्थितीत बच्चू कडू यांच्यासारख्या लढवय्या नेत्यांची गरज आहे. त्यांच्या रक्तातच आंदोलनाची धार आहे,” अशा शब्दांत टिकैत यांनी कौतुक केलं.








