controversy continues over Nitesh Ranes statement : मंत्री नितेश राणे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून कलगीतुरा सुरूच
Dharashiv / Mumbai : महायुतीमध्ये ‘ भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे’ अशी टिप्पणी करुन वादाला तोंड फोडणारे मंत्री नितेश राणे यांना, वडील माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीच समज दिली आहे. दरम्यान तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेशला खडसावलं आहे. तर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी नारायण राणे असताना फडणवीस त्यांचे बाप कसे झाले असा खोचक सवाल केला आहे.
मंत्री नितेश राणे यांचे वक्तव्य काही दिवसापासून चांगले चर्चेत आहे. यावरून दोन भावा मध्ये पण वादाची ठिणगी पडली यात आता वडील नारायण राणे यांनी, मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिली आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. मी मुख्यमंत्री असताना मी सांगायचो की, मला साहेब म्हणू नका सेवक म्हणा, अशा शब्दांत राणे यांनी नितेश यांचे कान टोचले. ते बुधवारी धाराशिवमध्ये आले होते. तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Sanjay Raut on Ajit Pawar: तर.. आज अजित पवार उपमुख्यमंत्री झाले नसते!
राणे यांनी म्हणले की, कोणाचा निधी अडवणं हे चुकीचं आहे. त्याबाबतही मी सूचना देणार आहे, अशी भूमिका मांडत जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबतच्या नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर राणेंनी पडदा टाकला. तसेच त्यांनी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांना पुन्हा लक्ष्य केले. प्रकाश महाजन हा मेंटल माणूस आहे. त्याच्याशी माझी तुलना का करता? मी दिल्लीला होतो आणि तो इकडे कुठे उभा राहातो क्रांती चौकात, त्याला भेटायला मी यायचं का?, अशा शब्दांत राणे यांनी संताप व्यक्त केला. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत की नाही, याबद्दल मला माहिती नाही. ते एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेशला खडसावल्याचे सांगितले जात आहे. मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत दिसून आले. आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी केला.
Padalkar vs Jayant Patil : ‘दिवा विझताना मोठा होतो’ तसं जयंत पाटलांचं झालंय !
त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना दिला. अशातच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नारायण राणेंचं नाव घेत डिवचलं आहे. ते म्हणाले, नितेश राणे यांचे बाप नारायण राणे आहेत. हे सगळं असताना देवेंद्र फडणवीस त्यांचे बाप कसे झाले, ते मलाही कळले नाही.








