Sanjay Raut : महापालिका जिंकण्यासाठी वॉर्ड फोडले जातील

Sanjay Raut Alleges Ward Manipulation : सत्ताधाऱ्यांच्या हेतूंवर संजय राऊत यांचे गंभीर आरोप

Mumbai: उच्च न्यायालयाने मुंबई सह स्थानिक स्वराज्यबसंस्थेच्य निवडणुक घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रभाग रचनेत गैरप्रकार होऊ शकतात असे सांगत. निष्पक्ष निवडणुकीची मागणी केली आहे. सोबत सत्ताधारी पक्षाच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत. सुमारे 4 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी तीन टप्प्यात प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश सरकारने दिले असून ऑक्टोबरमध्ये या निवडणूका होण्याची शक्यता आहे.

नगरविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना खा. संजय राऊत यांनी एक गंभीर आरोप केला आहे. महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रचनेबाबत आयोगाने आदेश दिला, पण प्रभाग रचना करणारे अधिकारी, सरकार आणि निवडणूक आयोग यावर कुणाचाही विश्वास नाही. आपल्याला सोयीचे ठरतील अशा पद्धतीने वॉर्ड फोडले जातील, प्रभाग रचना केल्या जातील आणि निवडणुकीत आपल्याला फायदा मिळवला जाईल, असा आरोप राऊत यांनी केला.

Pratap Sarnaik : ग्रुप बुकींगवर पंढरपूर साठी राज्यभरातून थेट बस मिळणार

सोयीचे, आणि निवडणुकीत फायदा मिळवला जाईल, या पद्धतीने काम करणारे सरकार आहे. पैशाची ताकद प्रचंड आहे. प्रशासनात दहशत निर्माण केली जाईल, हे सत्य आहे. विरोधी पक्षाने असा आक्षेप घेतला असेल तर गांभीर्याने पाहिलं पाहिजे असं राऊत म्हणाले. निष्पक्षपाती पद्धतीने हे काम झालं पाहिजे. त्यासाठी आयोगाने जागल्याची भूमिका घेतली पाहिजे. अधिकाराचा गैरवापर तर होणार नाही ना हे पाहिलं पाहिजे. महापालिकेचं खातं एकनाथ शिंदेंकडे आहे. त्यांचा इतिहास तुम्हाला माहीत आहे. अशा बाबतीत ते काही सरळ गृहस्थ नाहीत, अशा शब्दांत राऊतांनी शिंदेंवर टीकास्त्र सोडलं.

परत त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत. अमित शाह यांना मुंबई काबीज करायची आहे. त्यामुळे शाह आणि त्यांचा पक्ष, एसंशि, मुंबई मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातील अशी भीती व्यक्त करत आम्ही ते होऊ देणार नाही असा इशाराही राऊतांनी दिला. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे 13 तर आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 14 जूनला वाढदिवस आहे. त्यानिमित्त मुंबईत तसेच ठाण्यातही एकाच बॅनरवर फोटो लावून त्यांना एकत्र शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मनसे-शिवसेना युतीच्या चटर्चा सुरू असतानाच आदित्य आणि राज यांच्या एकत्र फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Indian Railways : आता 24 तास आधीच कळणार, तिकीट कन्फर्म आहे का?

याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी स्पष्ट केले की. ‘ एकमेकांचे नातेवाईक असलेल्या दोन नेत्यांना लोकं वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतील तर त्यात शंका घेण्याचं कारण नाही. कार्यकर्ते वाढदिवस साजरा करतात. कुटुंबापेक्षा कार्यकर्ते नेत्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. त्या त्यांच्या भावना आहेत’
राज ठाकरेंना आमचे कार्यकर्ते शुभेच्छा देत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे ती. शुभेच्छा देण्यासाठी कुणाची परवानगी लागत नाही. यात उगाच वेगळा अर्थ काढू नये, असा टोलाही राऊतांनी लगावला.