Even Congress leaders don’t take Rahul Gandhi seriously : गडकरींचा उलट सवाल; काँग्रेसही त्यांना फार गांभिर्याने घेत नाही
Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये गडकरींनी प्रत्येक क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आलेख मांडला. पण एका पत्रकाराचा प्रश्न आणि त्यावर गडकरींच्या उत्तरानेच पत्रकार परिषद गाजली.
राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत फिक्सींग झाल्याचा आरोप केला आहे, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे, असा सवाल एका पत्रकाराने केला. त्यावर ‘आप राहुल गांधी को इतना सिरीयसली क्यों लेते हो?’ असा उलट सवाल गडकरींनी केला. ‘राहुल गांधी यांना काँग्रेसचेच नेते फार गांभिर्याने घेत नाहीत,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ११ वर्षांचा लेखाजोखा मांडण्यासाठी पत्रकार परिषद घ्यायला हवी, असं एका पत्रकाराने म्हटलं. त्यावर गडकरींनी ‘तुमचा निरोप मोदीजींपर्यंत पोहोचवतो’, असं मिष्कील उत्तर दिलं. दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर देखील गडकरींना प्रश्न विचारण्यात आले.
Nitin Gadkari : गडकरींनी रस्त्यांच्या कामांची पाहणी केली, पण..?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन होणार असल्याच्या चर्चा होत्या. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत मोठी घडामोड मानली जात होती. अशात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात ताज लँड्समध्ये एक तास चर्चा झाली. या भेटीबद्दल आपलं काय म्हणणं आहे, असं गडकरींना विचारण्यात आलं. त्यावर ‘माझी कुणाचीच भेट झाली नाही’, या गडकरींच्या उत्तरावर जोरदार हशा पिकला.








