Congress leader Wadettiwar will visit protest site : शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे
Nagpur : गेल्या पाच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या महत्वाच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांना दिवसेंदिवस पाठींबा वाढतोय. अशा काँग्रेसनेही त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. बच्चू कडू शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न घेऊन उपोषणाला बसले आहेत. आमचा त्यांना पाठींबा आहे आणि येत्या १५ तारखेला मी त्यांची भेट घेणार आहे, असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसह इतर अनेक प्रश्न घेऊन राज्यभर आम्ही आंदोलन करत आहोत, असेही वडेट्टीवार यांनी आज (ता. १३ जून) नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले. महाराष्ट्रात निवडणुका पारदर्शी पद्धतीने झाल्या नाहित. यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद आहे. निवडणुकांमध्ये मतदानात जर असे घोटाळे होणार असतील तर या देशात लोकशाही शिल्लकच राहणार नाही. महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत चौकशी व्हावी, हीज मागणी राहुल गांधी करत आहेत. आमच्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आगोयाने द्यायला पाहिजेत, तर राजकीय नेते उत्तरे देत आहेत. यावरून भाजप नेते आणि निवडणूक आयोगाची युती स्पष्ट होते. निवडणुकीत गडबड झाली, बनवाबनवी करून हे सरकार आलं आहे.
Anil Deshmukh : ‘दाभडी’तील ‘चाय पे चर्चा’ कुठे गेली? मोदींना करवून दिली आठवण !
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या गदारोळ उडाला आहे. याबाबत विचारले असता, नाना पटोलेंच्या तोंडून एखाद वाक्य चुकीचं निघालंही असेल. पण ते बोललेल्या अनेक बाबी सत्य आहेत. त्या खोडून काढता काढता भाजप नेत्यांच्या नाकी नऊ येत आहेत. केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. पुलवामा हल्ल्यात आरडीएक्स कुणी आणलं आणि त्यातील चार अतिरेकी का सापडत नाहीत, याचे उत्तर अद्यापही सरकारने दिलेले नाही, याकडेही विजय वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.








