व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण NEET paper leak : नीट पेपर फुटीवरून नागपुरात राजकीय वादंग; काँग्रेसची राजभवनावर...

NEET paper leak : नीट पेपर फुटीवरून नागपुरात राजकीय वादंग; काँग्रेसची राजभवनावर धडक, पोलिस-कार्यकर्त्यांत झटापट

 

Congress stages protest in Nagpur Rajbhavan : नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दिल्या घोषणा, काहीना ताब्यात घेतले

Nagpur दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राहुल गांधी सहभागी झाल्यानंतर, आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या राजभवनावर धडक दिली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राजभवनात जाण्यापासून रोखताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट झाली, ज्यामुळे आणखीच असंतोष निर्माण झाला आहे.

“केंद्र सरकार चर्चा करायला तयार नाही, नीट परीक्षेत झालेल्या घोळाची जबाबदारी घेत नाही, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नसल्याने आम्ही राजभवनावर धडक दिली आहे,” असे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल गुडधे यावेळी म्हणाले.

NEET paper leak: विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकलेले असतानाच शरद पवार पंतप्रधान मोदींना भेटले!

नीट परीक्षेचे पेपर फुटले होते, त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वात जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर आंदोलन चांगलेच चिघळले आहे. देशभरातून केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला जात असून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. विरोधकांनी प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेचे कामकाज पाडले आहे.

NEET paper leak: NEET पेपर फुटीचा दिल्लीत भडका! विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार

उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असून दोन्ही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मंगळवारी राहुल गांधी हेसुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते. संसदेवर धडक देण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते, त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत.

नागपुरात प्रफुल गुडधे व काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या नेतृत्वात आज राजभवनावर धडक देण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट झाली. अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आणखी असंतोष वाढला आहे.

error: Content is protected !!